जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / OMG! तयार झालीय जगातील सगळ्यात छोटी बंदूक, किंमत मात्र आहे मोठी

OMG! तयार झालीय जगातील सगळ्यात छोटी बंदूक, किंमत मात्र आहे मोठी

OMG! तयार झालीय जगातील सगळ्यात छोटी बंदूक, किंमत मात्र आहे मोठी

जगातील सर्वात छोटी बंदूक नुकतीच (Interesting features of world’s smallest gun) समोर आली असून त्याची वैशिष्ट्यं आश्चर्यचकित करणारी आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बर्न, 17 ऑक्टोबर :  जगातील सर्वात छोटी बंदूक नुकतीच (Interesting features of world’s smallest gun) समोर आली असून त्याची वैशिष्ट्यं आश्चर्यचकित करणारी आहेत. स्विस मिनी गन या नावानं (Swiss Mini Gun) ओळखली जाणारी ही बंदूक जगातील सर्वात छोटी बंदूक असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या बंदुकीसाठी घड्याळ आणि ज्वेलरी (Jewelry and watch technic) तयार करण्यासाठीच्या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. अशी आहे बंदूक स्विस मिनी गन ही जगातील सर्वात छोटी बंदूक आहे, जी चालवता येऊ शकते. ही बंदूक 5.5 सेंटीमीटर लांब, 3.5 सेंटीमीटर रुंद आणि 1 सेंटीमीटर जाडीची आहे. बंदुकीचं वजन आहे फक्त 19.8 ग्रॅम. ही बंदूक तळहाताच्या एका कोपऱ्यात मावेल, एवढी छोटी आहे. मात्र या बंदुकीची किंमत मात्र बंदुकीएवढी छोटी नाही. बंदूक लपवणं सोपं ही बंदूक इतकी छोटी आहे की ती लपवणं सहज शक्य आहे. शर्टाच्या खिशात, ट्राऊझरच्या खिशात, एवढंच काय अगदी वॉलेटमध्ये किंवा केसातही ही बंदूक लपवता येऊ शकते. त्याच्या याच गुणामुळे काही देशांनी या बंदुकीच्या आयातीवर बंदी घातली आहे. विशेषतः अमेरिका आणि ब्रिटन या देशांन ही बंदूक आयात करण्यावर बंदी घातली असून ती बाळगणं बेकायदेशीर ठऱवलं आहे. ही बंदूक दिसायला छोटी असली तरी इतर कुठल्याही बंदुकीसारखी सर्व फिचर्स या बंदुकीमध्ये आहेत. सर्वसामान्यपणे बंदूक तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं, ते तर यात आहेच, मात्र त्याशिवाय ज्वेलरी आणि घड्याळ तयार करण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून यातील बारीकसारीक कलाकुसर करण्यात आली आहे. बंदुकीची किंमत छोट्या दिसणाऱ्या या बंदुकीची किंमत मात्र मोठी आहे. अशी एक बंदूक घेण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. या बंदुकीसोबत एक स्टायलिश लेदर होल्डरदेखील मोफत दिलं जातं. त्याचसोबत 24 लाईव्ह आणि 24 ब्लॅक कार्टेजेसदेखील देण्यात येतात. बंदुकीच्या रिंगच्या मदतीनं बेल्टला लटकावण्याची सोयदेखील यात आहे. हे वाचा - महिलेने दिला साडेसहा किलो वजनाच्या मुलाला जन्म, ऑर्डर करावं लागलं स्पेशल डायपर जीवघेणी नव्हे पण घातक या बंदुकीने एखाद्याचा जीव घेता येतो का, या प्रश्नाचं उत्तर होय आणि नाही असं दोन्ही आहे. या बंदुकीची पॉवर 1 जूलपेक्षा कमी आहे. त्यामुळे दूरून गोळी मारली तर कुणाचा जीव जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र अगदी मेंदूजवळून आणि नेमकी इजा होऊ शकणाऱ्या भागात गोळी मारली, तर मात्र ही बाब घातक ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात