• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • UAE मध्ये भारतीय नागरिकाला 20 कोटींची लॉटरी, विजेता मात्र आहे गायब; जाणून घ्या कारण

UAE मध्ये भारतीय नागरिकाला 20 कोटींची लॉटरी, विजेता मात्र आहे गायब; जाणून घ्या कारण

युएईमध्ये यावेळी एका भारतीय नागरिकानं (Indian won lottery in UAE but vanished after that) कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकूनदेखील रक्कम घेण्यासाठी तो पोहोचलेला नाही.

 • Share this:
  अबुधाबी, 4 ऑक्टोबर : युएईमध्ये यावेळी एका भारतीय नागरिकानं (Indian won lottery in UAE but vanished after that) कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकूनदेखील रक्कम घेण्यासाठी तो पोहोचलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा संपर्क होत नसून (No Contact of the winner) तो नेमका कुठे गेलाय, याचा अनेकजण शोध घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे या व्यक्तीचा फोनच लागत नसून त्या व्यक्तीकडूनही कुणाला फोन येत नसल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी या लकी ड्रॉचं (Lucky draw was organized on Sunday) आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या ठरलेल्या लकी ड्रॉचा नंबर होता 278109. विजेता झाला गायब ही लॉटरी जिंकणारे आहेत केरळचे मूळ रहिवासी नहील. नहील यांचे दोन्ही मोबाईल नंबर सध्या बंद असून त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या पहिल्या नंबरवर कॉल केल्यानंतर नंबर संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याची सूचना ऐकू येते. एकदा इंग्रजीतून आणि एकदा मल्याळी भाषेतून ही सूचना ऐकवली जाते. तर दुसरा नंबर आऊट ऑफ रिच आहे. हे दोन्ही नंबर लागत नसल्याने नहील यांना संपर्क तरी कसा साधायचा, असा प्रश्न लॉटरी कंपनीला पडला आहे. हे वाचा - धक्कादायक! व्यक्तीनं 75 मुलींसोबत केलं लग्न; या विचित्र कामासाठी करायचा वापर आणखी एका भारतीयालाही लॉटरी ही लॉटरी दुसऱ्या क्रमांकाने जिंकणारी व्यक्तीदेखील भारतीयच आहे. सौदी अरेबियात राहणारे भारतीय प्रवासी अँजेलो फर्नांडिस यांनी लॉटरी जिंकली आहे. त्यांनी 25 सप्टेंबरला खरेदी केलेल्या तिकीटाचा नंबर होता 000176. यापूर्वीदेखील दुबईतील राहणाऱ्या एका भारतीय प्रवाशाने ‘महजूज मिलेनियर ड्रॉ’मध्ये सहभाग घेत घसघशीत रक्कम जिंकली होती. एका रात्रीत ते कोट्यधीश झाले होते. लॉटरीची मुदत संपण्यापूर्वी केवळ काही तास अगोदर त्यांनी लॉटरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मीर हे लॉटरी जिंकून कोट्यधीश होणारे 15 वे नागरिक ठरले आहेत.
  Published by:desk news
  First published: