टोरांटो, 5 जानेवारी : कॅनडामध्ये (Canada) नुकताच एका भारतीय-कॅनडियन वंशाच्या महिला खासदाराला संसद सचिवपदाचा (Parliment Seceratary) राजीनामा द्यावा लागला (resigned). निमित्त झाली अगदी लहानशी गोष्ट. कमल खेरा (Kamal Khera) या कॅनडामध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. कॅनडात कोविड -19 (Covid-19) महामारीची दुसरी लाट आल्यानंतर दरम्यानच्या काळात त्यांच्या काकांचा अमेरिकेत (America) मृत्यू झाला. त्या काकांना श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून अमेरिकेला गेल्या होत्या. मात्र त्यांच्या या प्रवासाला अनावश्यक ठरवत सोशल मीडियावर (social media) त्यांच्या निर्णयावर खूप टीका केली गेली. यामुळे व्यथित होत त्यांनी आपल्या संसद सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. कमल खेरा या पूर्वीपासूनच लोकांना अनावश्यक प्रवास न करण्याचं आवाहन कोरोनाच्या काळात करत आहेत. आता त्याच अमेरिकेहून प्रवास करून कॅनडात परतल्या तशी सोशल मीडियात त्यांच्यावर टीका (criticism) होऊ लागली. कमल यांनी या टीकेचं उत्तर देताना म्हटलं, की त्या एका विशिष्ट हेतूनं अमेरिकेला गेल्या होत्या. हा दुःखाच्या प्रसंगी केलेला अत्यावश्यक प्रवास होता. यानंतर त्यांनी राजीनामा दिला. दिल्लीत जन्मलेल्या खेरा यांनी नर्स बनण्यासाठीचं प्रशिक्षणही घेतलेलं आहे. कोरोनावायरसच्या संकटकाळात लोकांची मदत करण्यास पुढे येणाऱ्यांचं त्यांनी कायमच कौतुक केलं आहे. त्या कॅनडाच्या अशा खासदार आहेत ज्यांना कोरोनाचं संक्रमण सर्वात आधी झालं होतं. टीकेमुळं अतिशय दु:खी होत त्या म्हणाल्या, की माझ्या वडिलांचा मृत्यू गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झाला. काही आठवड्यानंतर माझ्या काकांचा मृत्यू झाला. संसद सत्र संपल्यावर 23 डिसेंबरला त्या अमेरिकेला गेल्या आणि 31 डिसेंबरला परत आल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.