नवी दिल्ली, 9 मार्च : भारतात तयार करण्यात आलेले कोरोनाचे 45 मिलियन डोज (साडे चार कोटी) पाकिस्तानला देण्यात येणार आहे. पाकिस्तानला ही लस गावी लशीच्या कराराअंतर्गत देण्यात येणार आहे. हा करार पाकिस्तानसोबत सप्टेंबर 2020 मध्ये करण्यात आला होता. या अंतर्गत जगातील अनेक देशांना लस दिली जात आहे. (India to save lives of many Pakistani citizens, Corona vaccine will be exported)
या महिन्यात तब्बल 16 मिलियन कोविडच्या लस पाकिस्तानापर्यंत पोहोचविण्यात येईल आणि जूनपर्यंत 45 मिलियन डोज पाकिस्तानला मिळतील. शेजारील देश पाकिस्ताला सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस देण्यात येईल.
हे ही वाचा-कोरोना पॉझिटिव्ह असतानाही दिला निगेटिव्ह रिपोर्ट; पोलिसांकडून कंपनीचा पर्दाफाश
पाकिस्तानचे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे सचिव (एनएचएस) आमिर अशरफ ख्वाजा यांनी लोक लेखा समितीला (पीएसी) सांगितलं की, देशाला भारतात तयार करण्यात आलेली लस मिळेल. ख्वाजा पुढे म्हणाले की, आतापर्यंत पाकिस्तानात 27.5 मिलियन लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये फ्रंट वर्कर आणि वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे. (India to save lives of many Pakistani citizens Corona vaccine will be exported ) पाकिस्तानने आतापर्यंत चार लशी, सिनोफ्राम (चीन), ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका (ब्रिटेन), स्पूतनिक-वी (रशिया) आणि कॅनसिनो बायो (चीन)यांची नोंदणी केली आहे. गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तानातील नात्यांना वादविवाद सुरू असल्याचं दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानने 25 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर आणि अन्य भागातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंघीचं उल्लंघन करणार नसून सर्व कराराचं सक्तीने पालन करण्यावर सहमती दर्शवली होती.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.