इस्लामाबाद, 12 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्विट करून पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan’s new Prime Minister Shahbaz Sharif) यांचे अभिनंदन (congratulations) केले आहे. अभिनंदनासोबतच पीएम मोदींनी दहशतवादाचा (terrorism) मुद्दाही उपस्थित केला आहे. भारतालाही शांतता हवी आहे. जिथे दहशतवादाला जागा नाही असे त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. अभिनंदनासह पंतप्रधान मोदींचा राजकीय संदेश पीएम मोदींनी ट्विट करून लिहिलं आहे की, शाहबाज शरीफ यांना पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन. भारताला शांतता आणि स्थैर्य हवे आहे जेथे दहशतवादाला थारा नाही. जेव्हा असे होईल तेव्हा आपण विकासाच्या आव्हानांवर भर देऊ शकू आणि आपल्या लोकांचे भले करू शकू. आता पीएम मोदींचे हे ट्विट अधिक महत्त्वाचे आहे कारण त्यांनी अभिनंदनासोबतच दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. ते थेट काहीही बोलले नसले तरी पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना स्पष्ट संदेश दिला आहे.
Congratulations to H. E. Mian Muhammad Shehbaz Sharif on his election as the Prime Minister of Pakistan. India desires peace and stability in a region free of terror, so that we can focus on our development challenges and ensure the well-being and prosperity of our people.
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2022
पाकिस्तान ज्या प्रकारे काश्मीरमध्ये संघटित दहशतवाद पाहतो, शेजारील देशांचे दहशतवादी ज्या प्रकारे खोऱ्यातील वातावरण बिघडवतात, त्यावर पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जेव्हा दहशतवादावर नियंत्रण येईल तेव्हाच शांतता आणि स्थैर्य शक्य आहे. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. काश्मीर प्रश्न सुटल्यानंतरच शांतता प्रस्थापित होऊ शकते, असा त्यांचा आग्रह होता. काश्मीरवर काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान? भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघत नाही तोपर्यंत हे शक्य नाही, असे पाक पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते. आम्ही काश्मिरी लोकांना त्यांच्या हातात सोडू शकत नाही. राजनैतिकदृष्ट्या आम्ही काश्मिरी जनतेला आमचा पाठिंबा देत राहू. आता जेव्हा पाक पंतप्रधानांनी सतत काश्मीरचा जयघोष केला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचे नाव न घेता मोठा राजकीय संदेश दिला.
पाकिस्तानातील सद्यस्थितीबाबत बोलायचे झाले तर तेथील नव्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळावर मंथन अधिक तीव्र झाले आहे. पीएमएल-एनच्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, अशी बातमी आहे. त्याचबरोबर पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) ला 7 आणि JUI-F ला 4 मंत्रीपदे दिली जातील. दुसरीकडे, एमक्यूएम-पीकेचे दोन आणि एएनपी, जम्हुरी वतन पार्टी आणि बलुचिस्तान अवामी पार्टीच्या प्रत्येकी एका मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. बिलावल भुट्टो झरदारी हे पुढील परराष्ट्र मंत्री असू शकतात, असेही बोलले जात आहे.