Home /News /videsh /

UNSC मध्ये पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांची जम्मू-काश्मीरबाबत अयोग्य टीप्पणी, भारताने फटकारलं

UNSC मध्ये पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांची जम्मू-काश्मीरबाबत अयोग्य टीप्पणी, भारताने फटकारलं

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) जम्मू आणि काश्मीरबाबत “अयोग्य टिप्पणी” केल्याबद्दल भारताने शुक्रवारी पाकिस्तानला (Pakistan) फटकारले. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी UNSC मधील चुकीची होती.

पुढे वाचा ...
  न्यूयॉर्क, 20 मे : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) जम्मू आणि काश्मीरबाबत “अयोग्य टिप्पणी” केल्याबद्दल भारताने शुक्रवारी पाकिस्तानला (Pakistan) फटकारले. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी UNSC मधील केलेलं वक्तव्य चुकीचं होतं. त्यांचा उद्देश्य कोणत्याही व्यासपीठाचा आणि प्रत्येक विषयाचा गैरवापर करून भारताविरोधात खोटा आणि चुकीचा प्रचार करणे हा आहे. भारताने पाकिस्तानला फटकारले -  बिलावल यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यासोबतच केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमांकन आयोगाने सध्या ज्या शिफारशींचा जो मुद्दा उपस्थित केला, त्यानंतर  यानंतर भारताने पाकिस्तानला फटकारले. परराष्ट्र मंत्री म्हणून अमेरिकेच्या पहिल्या दौऱ्यावर न्यूयॉर्कमध्ये आलेले बिलावल यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्याला भारताने उत्तर दिले. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनचे दूत राजेश परिहार (Rajesh Parihar UN India) यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी अयोग्य टिप्पणी केली आहे. कोणत्याही व्यासपीठाचा आणि प्रत्येक विषयाचा गैरवापर करून भारताविरुद्ध खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करणे हा त्यांचा उद्देश्य आहे. परिहार पुढे म्हणाले, "जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होते, आहेत आणि असतील. यामध्ये पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या भागांचाही समावेश आहे. कोणत्याही देशाने केलेले वक्तव्य किंवा प्रचार ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. हेही वाचा -  महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, TV वरील महिला प्रेजेंटर्संसाठी नवीन नियम
  'आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, संघर्ष आणि अन्न सुरक्षा' या विषयावर अमेरिकेने आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत भारताने उत्तर देण्याचा अधिकार वापरला. यावेळी परिहार म्हणाले, "पाकिस्तान एकच योगदान देऊ शकतो आणि ते म्हणजे राष्ट्र प्रायोजित दहशतवादाला आळा घालणे." तसेच जोपर्यंत त्याच्या इतर टिप्पण्यांचा संबंध आहे, आम्ही त्याच्याशी त्यांच्या पात्रतेप्रमाणे वागू, असेही संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनचे दूत राजेश परिहार यांनी सांगितले.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: India, Pakistan, UNSC

  पुढील बातम्या