दोन बुरखाधारी महिलांच्या मध्ये उभी असणारी छोटी मुलगी. या बाजारात अनेक नागरिक घरातील महागड्या वस्तू विकतात आणि जीवनावश्यक साहित्य खरेदी करतात.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडलेल्या बुरखाधारी महिला आणि मुलं. हे सगळे सध्या छावण्यांमध्ये राहत आहेत.
तालिबानची सत्ता आल्यापासून अनेक महिलांना जीव गमावावा लागला, अनेकांना घरदार सोडून पळ काढावा लागला, अनेकींनी नोकऱ्या सोडल्या तर अनेकजणी आता पुन्हा शून्यातून सुरुवात करत आहेत.
व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या अफगाणि नागरिकांना तालिबानी फायटर्स रोखून धरत असल्याचं चित्र जागोजागी दिसत आहे.