Home /News /videsh /

NO-Confidence Motion Against Imran Khan: शेवटच्या बॉलवर इम्रान खान यांचा 'सिक्स', सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव संसदेत फेटाळला

NO-Confidence Motion Against Imran Khan: शेवटच्या बॉलवर इम्रान खान यांचा 'सिक्स', सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव संसदेत फेटाळला

Pakistan No Trust Vote: पाकिस्तानमधील (Pakistan) राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आता नवी राजकीय लढाई सुरू झाली आहे. 'कॅप्टनचा प्लॅन बी' यशस्वी झाला आहे.

    कराची, 03 एप्रिल: पाकिस्तानमधील (Pakistan) राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आता नवी राजकीय लढाई सुरू झाली आहे. 'कॅप्टनचा प्लॅन बी' यशस्वी झाला आहे. रविवारी नॅशनल असेंब्लीमध्ये (National Assembly) इम्रान सरकारमधील (Imran government) मंत्री चौधरी फवाद हुसैन (Chaudhry Fawad Hussain) यांनी 'प्लॅन बी' आजमावला आणि काही क्षणातच विरोधकांची तारांबळ उडाली. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेवटच्या चेंडूवर 'सिक्स' लगावत राजकीय मैदान जिंकलं आहे. रविवारी अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वी काही वेळापूर्वी नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने अविश्वास ठराव फेटाळला. अशा प्रकारे इम्रान खान आपली खुर्ची वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत. विरोधक आता न्यायालयात धाव घेणार आहेत. मात्र, तोपर्यंत इम्रान खान हेच ​​विद्यमान पंतप्रधान राहतील. नॅशनल असेंब्लीमध्ये फवाद हुसैन म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव हा सामान्यतः लोकशाही अधिकार आहे. घटनेच्या कलम 95 अन्वये अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मात्र दुर्दैवाने परकीय सरकारद्वारे सत्ता परिवर्तनासाठी हे एक प्रभावी ऑपरेशन आहे. त्यांच्या भाषणानंतर काही क्षणातच नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी अविश्वास ठराव फेटाळून लावला आणि कामकाज तहकूब केले. महाराष्ट्र Unlock, चीनमध्ये lockdown; एका दिवसात Corona रुग्णांची संख्या दुप्पट उपसभापतींनी परकीय कारस्थानाचा आरोप करत अविश्वास प्रस्ताव फेटाळला. हे असंवैधानिक असल्याचंही म्हटलं आहे. संसदेची पुढील बैठक 25 एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी, इम्रान खान सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या होऊ शकते असा खळबळजनक दावा केला होता आणि सुरक्षा यंत्रणांना त्याच्या कटाची माहिती मिळाली आहे. सी रिपोर्ट आल्यानंतर इम्रान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पीटीआयचे नेते फैसल वावडा यांनीही असाच दावा केला होता. अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले. या संपूर्ण घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, मी राष्ट्राध्यक्षांना विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला पाठवला आहे. निवडणुका आहेत आणि लोक ठरवतात त्यांना कोणाला हवंय. बाहेरून कोणतंही षडयंत्र होऊ देऊ नका आणि असे भ्रष्ट लोक या देशाचे भवितव्य ठरवू दे. मी आज माझ्या समाजाला सांगतो की, तुम्ही निवडणुकीची तयारी करा, देशातून जे मोठे षडयंत्र रचले जात होते ते आज अयशस्वी झाले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Imran khan, Pak pm Imran Khan, Pakistan

    पुढील बातम्या