जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

फाळणीच्या वेळी मोठ्या संख्येने हिंदूंनी पाकिस्तान सोडला असला तरी त्यांच्या भव्य हवेल्या आजही आश्चर्यचकित करतात. या हवेल्या केवळ भव्य वास्तुकलेची झलकच नाही तर त्यांच्या समृद्ध जीवनशैलीचे वैशिष्ट्य देखील आहे.

01
News18 Lokmat

भारत-पाकिस्तानमध्ये कितीही वाद असला तरी दोन्ही देशांनी आजवर एकमेकांचा वारसा जपला आहे. पाकिस्तानचे उदाहरण द्यायचे झाले तर काही अतिशय सुंदर इमारती आजही तिथला हिंदू इतिहास जपून ठेवतात. अजूनही अनेक हवेल्या आहेत, विशेषत: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोतोहार भागात, जिथे केवळ हिंदू मालकच नव्हते, तर त्यांची वास्तुकला हिंदूंच्या काही शैली दर्शवते. यापैकी काही हवेल्या रिकाम्या पडल्या आहेत, तर काहींमध्ये अजूनही काही रहिवासी आहेत. (Photo-dawn)

जाहिरात
02
News18 Lokmat

पोतोहार हवेल्यांनी भरलेला आहे. हवेली हा फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ एक मोठी आणि प्रशस्त इमारत होतो. हे सहसा उच्चभ्रू वर्गातील लोकांचे निवासस्थान होते. पोतोहारच्या या हवेलींपैकी एक म्हणजे खेमसिंह बेदी हवेली. अविभाजित भारतातील रावळपिंडी येथे जन्मलेल्या खेम सिंग बेदी यांच्या नावावरून या हवेलीचे नाव आहे. बेदींची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते स्वतःला शीख गुरु नानक देव यांचे वंशज म्हणतात. त्या काळात सुशिक्षित असलेला बेदींचा वाडाही खूप प्रशस्त आहे. त्यात हिंदू आणि इंग्रजी वास्तुकला पाहायला मिळते. (Photo-dawn)

जाहिरात
03
News18 Lokmat

दौलताना शहरातही हिंदू हवेल्या आहेत. त्यापैकी आत्मासिंग गुजराल आणि जीवनसिंग हवेली प्रमुख आहेत. या हवेल्यांचे प्लास्टरिंग उखडल्यानंतरही भिंती भक्कमपणे उभ्या आहेत. हवेलीच्या प्रवेशद्वारावर हवेलीच्या मालकाचे नाव इंग्रजी आणि उर्दूमध्ये कोरलेले दिसते. या शहराव्यतिरिक्त गुलयाना आणि डोरा बादल गावात अनेक हिंदू हवेल्या आहेत. (Photo-dawn)

जाहिरात
04
News18 Lokmat

हवेलींचे स्थापत्य विविध प्रकारचे असले तरी सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. त्यांना लाकडापासून बनवलेल्या मोठ्या खिडक्या आहेत. लाकडावर कोरीवकाम किंवा चित्रेही आहेत, जी हवेलीतील रहिवाशांच्या जीवनशैलीनुसार किंवा आवडीनुसार असावीत. खिडक्या बनवताना वास्तुविशारदांचे मतही महत्त्वाचे वाटते. खिडक्या फक्त पुरुष सदस्यांसाठीच होत्या. महिलांना त्यांच्यात डोकावण्याची परवानगी नव्हती. (Photo-dawn)

जाहिरात
05
News18 Lokmat

खिडक्यांव्यतिरिक्त हवेलीच्या वरच्या मजल्यावर एक बाल्कनी असायची, जी महिला आणि पुरुष दोघेही वापरत असावे. प्राचीन काळी जवळजवळ सर्व समुदायांमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र बैठकीची जागा होती. परंतु, घरांचे वरचे भाग सहसा दोघांसाठी असायचे. कारण वरच्या भागात घरातील सदस्यांनाच प्रवेश होता. (Photo-dawn)

जाहिरात
06
News18 Lokmat

अनेक हवेल्या मोठ्या असण्यासोबत उंचही आहेत. यापैकी एक म्हणजे बक्षी राम हवेली. वर चढताना संपूर्ण गाव किंवा शहराचा नजारा सहज दिसेल अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली होती. हे केवळ संरक्षणाच्या उद्देशानेच नव्हे तर हवामानाचा आनंद घेण्यासाठी देखील तयार केले गेले असावे. (Photo-dawn)

जाहिरात
07
News18 Lokmat

कलार सैदानात देखील अशीच एक हवेली होती, खेमसिंग बेदी हवेली. भारत-पाक फाळणीनंतर तिचे शाळेत रूपांतर झाले. मात्र, शाळा बांधल्यानंतरही तिची इमारत व वास्तू यांच्याशी छेडछाड करण्यात आली नाही. शाळेच्या खोल्यांमध्ये शीख गुरुंशिवाय हिंदू देवदेवतांची चित्रे आहेत. तसेच शीख महिलांना श्रृंगार करताना दाखवण्यात आले आहे. (Photo-dawn)

जाहिरात
08
News18 Lokmat

पाकिस्तानातील पोतोहारमध्ये पर्यटनाची मोठी क्षमता असूनही त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. बहुतांश हवेल्या हवामानाशी तोंड देत उभ्या आहेत. सध्या पोतोहारमधील पर्यटकांसाठी कटस राज मंदिर हे एकमेव ठिकाण असल्याचे सांगितले जाते. मंदिरांच्या या रांगेला किला कटस असेही म्हणतात. येथे एक तलाव देखील आहे. असे म्हणतात की हा तलाव महादेवाच्या अश्रूंनी बनला आहे, जे त्यांनी पत्नी सतीच्या मृत्यूनंतर वाहिले होते. (Photo-dawn)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

    भारत-पाकिस्तानमध्ये कितीही वाद असला तरी दोन्ही देशांनी आजवर एकमेकांचा वारसा जपला आहे. पाकिस्तानचे उदाहरण द्यायचे झाले तर काही अतिशय सुंदर इमारती आजही तिथला हिंदू इतिहास जपून ठेवतात. अजूनही अनेक हवेल्या आहेत, विशेषत: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोतोहार भागात, जिथे केवळ हिंदू मालकच नव्हते, तर त्यांची वास्तुकला हिंदूंच्या काही शैली दर्शवते. यापैकी काही हवेल्या रिकाम्या पडल्या आहेत, तर काहींमध्ये अजूनही काही रहिवासी आहेत. (Photo-dawn)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

    पोतोहार हवेल्यांनी भरलेला आहे. हवेली हा फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ एक मोठी आणि प्रशस्त इमारत होतो. हे सहसा उच्चभ्रू वर्गातील लोकांचे निवासस्थान होते. पोतोहारच्या या हवेलींपैकी एक म्हणजे खेमसिंह बेदी हवेली. अविभाजित भारतातील रावळपिंडी येथे जन्मलेल्या खेम सिंग बेदी यांच्या नावावरून या हवेलीचे नाव आहे. बेदींची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते स्वतःला शीख गुरु नानक देव यांचे वंशज म्हणतात. त्या काळात सुशिक्षित असलेला बेदींचा वाडाही खूप प्रशस्त आहे. त्यात हिंदू आणि इंग्रजी वास्तुकला पाहायला मिळते. (Photo-dawn)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

    दौलताना शहरातही हिंदू हवेल्या आहेत. त्यापैकी आत्मासिंग गुजराल आणि जीवनसिंग हवेली प्रमुख आहेत. या हवेल्यांचे प्लास्टरिंग उखडल्यानंतरही भिंती भक्कमपणे उभ्या आहेत. हवेलीच्या प्रवेशद्वारावर हवेलीच्या मालकाचे नाव इंग्रजी आणि उर्दूमध्ये कोरलेले दिसते. या शहराव्यतिरिक्त गुलयाना आणि डोरा बादल गावात अनेक हिंदू हवेल्या आहेत. (Photo-dawn)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

    हवेलींचे स्थापत्य विविध प्रकारचे असले तरी सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. त्यांना लाकडापासून बनवलेल्या मोठ्या खिडक्या आहेत. लाकडावर कोरीवकाम किंवा चित्रेही आहेत, जी हवेलीतील रहिवाशांच्या जीवनशैलीनुसार किंवा आवडीनुसार असावीत. खिडक्या बनवताना वास्तुविशारदांचे मतही महत्त्वाचे वाटते. खिडक्या फक्त पुरुष सदस्यांसाठीच होत्या. महिलांना त्यांच्यात डोकावण्याची परवानगी नव्हती. (Photo-dawn)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

    खिडक्यांव्यतिरिक्त हवेलीच्या वरच्या मजल्यावर एक बाल्कनी असायची, जी महिला आणि पुरुष दोघेही वापरत असावे. प्राचीन काळी जवळजवळ सर्व समुदायांमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र बैठकीची जागा होती. परंतु, घरांचे वरचे भाग सहसा दोघांसाठी असायचे. कारण वरच्या भागात घरातील सदस्यांनाच प्रवेश होता. (Photo-dawn)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

    अनेक हवेल्या मोठ्या असण्यासोबत उंचही आहेत. यापैकी एक म्हणजे बक्षी राम हवेली. वर चढताना संपूर्ण गाव किंवा शहराचा नजारा सहज दिसेल अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली होती. हे केवळ संरक्षणाच्या उद्देशानेच नव्हे तर हवामानाचा आनंद घेण्यासाठी देखील तयार केले गेले असावे. (Photo-dawn)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    पाकिस्तानातील हिंदूंच्या 'त्या' अलिशान हवेल्या, ज्यांची श्रीमंती करेल अचंबित!

    कलार सैदानात देखील अशीच एक हवेली होती, खेमसिंग बेदी हवेली. भारत-पाक फाळणीनंतर तिचे शाळेत रूपांतर झाले. मात्र, शाळा बांधल्यानंतरही तिची इमारत व वास्तू यांच्याशी छेडछाड करण्यात आली नाही. शाळेच्या खोल्यांमध्ये शीख गुरुंशिवाय हिंदू देवदेवतांची चित्रे आहेत. तसेच शीख महिलांना श्रृंगार करताना दाखवण्यात आले आहे. (Photo-dawn)

    MORE
    GALLERIES

  • 08 08