वॉशिंग्टन, 19 मार्च : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. अजूनही याचा प्रभाव कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत आता अमेरिकेत एक नवीन विषाणू (Virus) वेगाने पसरत आहे. हा विषाणू एखाद्या लहान जीवाच्या चाव्याव्दारे पसरत असला तरी तो अत्यंत प्राणघातक मानला जातो. हा लहान प्राणी एक टिक (Tick), आहे, जो प्राणी आणि मानवांच्या शरीराला चिकटून राहतो आणि त्यांचे रक्त शोषतो. यासोबतच हा विषाणू मानवी शरीरात अनेक प्रकारचे आजारही निर्माण करतो. हार्टलँड व्हायरस (Heartland Virus) अमेरिकेतील 6 राज्यांमध्ये पसरला आहे. सध्या तो जॉर्जियामध्ये पसरत आहे. लोन स्टार टिक या टिक जीवांच्या प्रजातीद्वारे त्याचा प्रसार होत आहे. हार्टलँड व्हायरसची लागण झालेल्या काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) ने म्हटले आहे की या विषाणूमुळे मृत्यूची संख्या अजूनही कमी आहे. याचा संसर्ग झालेले बहुतेक लोक बरे होतात पण त्यामुळे काही वृद्ध लोकांचा मृत्यू झाला आहे. CDC ने माहिती दिली आहे की हार्टलँड व्हायरस पहिल्यांदा 2009 मध्ये अमेरिकेतील मिसूरी येथे मानवांमध्ये आढळला होता. 2009 ते जानेवारी 2021 या कालावधीत याने बाधित झालेल्यांची संख्या 50 होती. तो आर्कान्सा, जॉर्जिया, इलिनॉय, इंडियाना, आयोवा, केंटकी, मिसूरी, नॉर्थ कॅरोलिना, ओक्लाहोमा आणि टेनेसी येथे पसरला. संशोधकांचे म्हणणे आहे की या विषाणू आणि रोगाबद्दल अद्याप फारसे माहिती नाही. पण त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी संशोधक सतत संशोधन करत असतात. डेल्टाक्रॉनमुळे पुन्हा भितीचं वातावरण, किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणे? या विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असल्याने त्याबाबत संशोधन करण्यात येत आहे. एमोरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधनात शोधून काढले की जॉर्जियामध्ये सापडलेला एकमेव लोन स्टार टिक हार्टलँड विषाणूचा प्रसार करत आहे. हा अहवाल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजेस या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 2005 मध्ये जॉर्जियामध्येही यामुळे मृत्यू झाला होता. हार्टलँड व्हायरस रोगाची लक्षणे कोणती आहेत? जेव्हा एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण होते तेव्हा त्याला ताप, भूक न लागणे, डोकेदुखी, सर्दी, जुलाब आणि स्नायू दुखणे होते. सीडीसीनुसार, रुग्णामध्ये पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्सची पातळी कमी होते. तसेच यकृतातील एन्झाईम्सची पातळी वाढते. त्याची चाचणी कशी केली जाते? आतापर्यंत हार्टलँड व्हायरसचा एखाद्याला संसर्ग झाला आहे, हे शोधण्यासाठी जगात कोणतीही विशिष्ट चाचणी नाही. अमेरिकेत एखाद्याला संसर्ग झाल्याचा संशय असल्यास डॉक्टर राज्य प्रशासनाशी संपर्क साधतात. यानंतर प्रशासन सीडीसीशी संपर्क साधते. त्या व्यक्तीच्या आण्विक आणि सेरोलॉजिकल चाचण्या होतात. यानंतर या प्रकरणात हार्टलँड व्हायरस आरएनए आढळून येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.