जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Greece Boat News : काल 100 आज 79 जणांचा मृत्यू, 500 प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज बुडालं

Greece Boat News : काल 100 आज 79 जणांचा मृत्यू, 500 प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज बुडालं

Greece Boat News  : काल 100 आज 79 जणांचा मृत्यू, 500 प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज बुडालं

कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार अंधारामुळे बचाव कार्य थांबवावे लागले. गुरुवारी पहाटे पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ग्रीस : प्रवाशांनी भरलेलं जहाज बुडाल्याची माहिती मिळाली आहे. या जहाजातील 79 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. ही दुर्घटना ग्रीसमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. जहाजातील प्रवासी स्थलांतर करुन जात असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बचाव कार्यात तटरक्षक दलाची सहा जहाजे, नौदलाचे एक जहाज, लष्कराचे वाहतूक विमान आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर यांसह ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार अंधारामुळे बचाव कार्य थांबवावे लागले. गुरुवारी पहाटे पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत 104 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर त्यांना उपचारासाठी जवळच्या छावण्यांमध्ये पाठवण्यात आलं आहे.

Optical Illusion : समुद्राच्या काठावर मांजर बसलीय लपून, 9 सेकंदात शोधून काढा पण जरा जपून

यामध्ये 30 इजिप्शियन, 10 पाकिस्तान, 35 सीरिया आणि दोन पॅलेस्टिनी नागरिकांचा समावेश आहे. ग्रीक तटरक्षक दलाने सांगितले की, बोटीतील किती प्रवासी बेपत्ता आहेत याची पुष्टी अद्याप होऊ शकली नाही. इटलीला जाणारी ही बोट लिबियाच्या पूर्वेकडील टोब्रुक भागातून निघाली होती असे समजते.

News18लोकमत
News18लोकमत

मिळालेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या लोकांना कलामाता शहरात नेण्यात आले आहे. येथील महापौरांनी सांगितले की, सर्व लोकांचे वय 16 ते 41 वर्षे दरम्यान आहे. बोटीत महिला आणि लहान मुलेही होती. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बोट बुडण्याची घटना भयानक असल्याचे म्हटले आहे. यूएनने ट्विट केले की, प्राथमिक माहितीनुसार, बोटीत सुमारे 400 लोक होते.

बिपरजॉय किनाऱ्यावर धडकण्याआधीच अशी परिस्थिती, आल्यावर काय होईल? पाहा VIDEO

नायजेरियात मंगळवारी बोट उलटून 100 जणांचा मृत्यू झाला. नायजर राज्यातील आगबोटी गावात एका लग्न समारंभात सहभागी होऊन बोटीतील लोक परतत असताना हा अपघात झाला. बोटीत महिला आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने होती. अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. बोटीत 100 हून अधिक लोक होते आणि अनेक लोक त्यांच्यासोबत बाईक घेऊन जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे 3 वाजता हा अपघात झाला, त्यामुळे अपघाताच्या वेळी लोकांपर्यंत मदत पोहोचू शकली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात