मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अमेरिकेत राहणाऱ्या असंख्य भारतीयांसाठी खूशखबर; जो बायडन यांनी उचललं मोठं पाऊल

अमेरिकेत राहणाऱ्या असंख्य भारतीयांसाठी खूशखबर; जो बायडन यांनी उचललं मोठं पाऊल

जो बायडन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेतील असंख्य भारतीयांना त्रस्त करणारी समस्या सुटण्याची शक्यता आहे

जो बायडन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेतील असंख्य भारतीयांना त्रस्त करणारी समस्या सुटण्याची शक्यता आहे

जो बायडन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेतील असंख्य भारतीयांना त्रस्त करणारी समस्या सुटण्याची शक्यता आहे

वॉशिंग्टन, 20 मार्च : अमेरिकेत राहणाऱ्या पाच लाखांहून अधिक भारतीयांना (Indians) फायदा होईल, असं विधेयक अमेरिकेतील संसदेत (American Parliament) पारित झालं आहे. संसदेच्या हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव या सदनात ‘अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस अॅक्ट’  नावाचं बिल पारित झालं आहे. याची अंमलबजावणी केल्यानंतर लहानपणापासून अवैध्य रुपात अमेरिकेत राहणाऱ्या प्रवासी लोकांना नागरिकत्व मिळवणं सोपं होईल. भारतीयांबद्दल सांगायचं झालं तर 5 लाखांहून अधिक भारतीयांना याचा फायदा होणार आहे.

समर्थनार्थ मिळाले इतकी मतं

‘हिंदुस्तान’ च्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या संसदेच्या खालच्या सदनने अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस अॅक्टला (American Dream and Promise Act) 228-197 मतांच्या फरकाने पारित करीत याला सीनेटमध्ये पाठविण्यात आलं आहे. येथून पारित झाल्यानंतर कायदा तयार होईल. या बिलामुळे ज्यांना कायदेशीर निरीक्षणाखाली राहावं लागत आहे आणि ज्यांना देशवापसीची भीती असले अशांना नागरिकत्व मिळवणं सोपं होईल.

हे ही वाचा-पुतीनला किंमत मोजावी लागेल', बायडेन यांच्या इशाऱ्यानंतर रशियाचा मोठा निर्णय!

Joe Biden यांनी केलं समर्थन

सांगितलं जात आहे की, सरकारच्या या पावलामुळे 5 लाखांहून अधिक भारतीयांसह तब्बल 1 कोटी 10 लाख असेही नागरिक आहेत, ज्यांना कायदपत्रं नसतानाही अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बिलचं समर्थन करीत असताना म्हणाले की, माझी इच्छा आहे काँग्रेसने हे बिल पारित करावे. ज्यामुळे 1.1 कोटी प्रवाशांना देशाचं नागरिकत्व मिळणं शक्य होईल. राष्ट्राध्यक्ष बायडेन पुढे म्हणाले की, मी या विधेयकाचं समर्थन करतो आणि या महत्त्वपूर्ण कायद्याला पारित करण्यामागे पुढाकार घेतल्याबाबत कौतुक करतो.

First published:
top videos

    Tags: India america, Joe biden