मराठी बातम्या /बातम्या /विदेश /या शहरात बिअरचे भाव सर्वाधिक, जाणून घ्या कुठे आहे सगळ्यात कमी किंमत

या शहरात बिअरचे भाव सर्वाधिक, जाणून घ्या कुठे आहे सगळ्यात कमी किंमत

beer

beer

जगभरातील विविध देशांमधील बिअरच्या किमती दर्शवणारी एक यादी तयार करण्यात आली आहे. यामुळे कोणत्या देशात बिअरची सर्वसाधरण किंमत किती आहे, हे बिअरप्रेमींना सहजपणे समजू शकणार आहे.

    नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : अन्य देशांमध्ये पर्यटनाला, प्रवासाला जाताना संबंधित देशात बिअरच्या(Beer)किमती किती आहेत, हा निकष लावत तुम्ही प्रवासाचे नियोजन नक्कीच कधीही केले नसणार. परंतु, पर्यटनानिमित्ताने एखाद्या देशात तुम्ही असताना तुम्हाला तेथे अगदी स्वस्तात बिअर मिळाल्याने तुम्हाला याचे आश्चर्य वाटले आहे का? किंवा या उलट स्थितीत एखाद्या हॉटेलमध्ये महाग बिअर मिळाल्याने तुम्ही कधी कुरकुर केल्याचे तुम्हाला आठवतं का? हा आश्चर्याचा भाग सोडा, नुकतीच जगभरातील विविध देशांमधील बिअरच्या किमती दर्शवणारी एक यादी तयार करण्यात आली आहे. यामुळे कोणत्या देशात बिअरची सर्वसाधरण किंमत किती आहे, हे बिअरप्रेमींना सहजपणे समजू शकणार आहे.

    वर्ल्ड बिअर इंडेक्स 2020 (World Beer Index) साठी एक्सपेन्सिव्हीटी (Expencivity) या वित्तीय सल्लागार साईटने जगातील 58 देशांच्या राजधानींमधील सुपरमार्केटमधील हॉटेल लॉबीमध्ये 12 औंसच्या बिअरच्या किमती यूएस डॉलरमध्ये कशा असतील याचा दोन प्रकारे डेटा सेट केला आहे.(कोरोना आणि हेनकेनसारख्या नामांकित बिअर ब्रॅंण्डवर लक्ष केंद्रीत करत) त्यानंतर हा डेटा एकत्रित करुन बिअरची सरासरी किंमत काढण्यात आली आहे.

    फूड अॅण्ड वाईनच्या (Food And Wine) वृत्तानुसार, या डेटावरुन कतार या देशातील दोहा(Doha) येथे बिअरची किंमत सर्वात जास्त असल्याचं दिसून येतं. येथे बिअरची सरासरी किंमत 11.26 डॉलर अशी आहे. 2022 मधील विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बहुतांश मुस्लिम देशांनी अल्कोहोल आयातीवर 100 टक्के कर लावला आहे. तसंच प्रवाशांना मद्यप्राशनासाठी विशेष परवानगी घेण्याची गरज आहे. दोहामधील सर्वात महाग स्टोअरमध्ये जर तुम्ही बिअर खरेदी केली तर तिची किंमत 9.34 डॉलर आहे. त्यानंतर किमतीच्या बाबत दुसरा क्रमांक लागतो तो जॉर्डनमधील (Jordan) अम्मानचा. येथे दोहाच्या तुलनेत बिअरची किंमत 3 डॉलरने कमी म्हणजेच 6.25 डॉलर प्रतिबॉटल असा आहे.

    अवश्य वाचा -    Tiktok Stars Suicide: या लोकप्रिय टिकटॉक स्टार्सनी नैराश्यातून संपवलं आयुष्य

    या किमती पाहिल्यावर आता स्वस्त बिअर कोणत्या देशात मिळते त्यावर नजर टाकू या.. जगातील सर्वात स्वस्त बिअर सुपरमार्केट इटलीतील रोममध्ये(Rome)आहे. येथे फक्त 0.58 डॉलर्स प्रतिबॉटल अशी बिअरची किंमत आहे. दरम्यान सर्वात स्वस्त हॉटेल बिअर ही दक्षिण अफ्रिकेत(South Africa) मिळते. देशातील तीन राजधान्या म्हणजेच प्रिटोरिया, ब्लोमफॉन्टेन आणि केपटाऊन शहरातील हॉटेल्समध्ये लॉबी बिअरची किंमत सरासरी 2.40 डॉलर्स एवढी आहे. दक्षिण अफ्रिकेत बिअरच्या किंमती अधिक स्वस्त म्हणजेच सरासरी फक्त 1.68 डॉलर्स करण्यात आल्या आहेत. या देशात बिअरचा उत्पादन खर्च सरासरी 0.96 डॉलर्स आहे.

    दोहामध्ये हॉटेल बिअरचे दर चीनमधील बीजिंगच्या (Bijing) तुलनेत जास्त म्हणजेच 13.19 डॉलर आहेत. हॉटेल लॉबीमध्ये तुम्ही बिअर घेतली तर तुम्हाला त्यासाठी 13.61 डॉलर्स मोजावे लागतात. जर तुम्ही बीजिंगमध्ये गेलात तर तेथे बिअरची सूचीबध्द किंमत 12 डॉलरने कमी म्हणजेच 1.81 डॉलर्स अशी आहे.

    सर्वात महाग बिअरच्या यादीत अमेरिका (America) 45 व्या स्थानावर आहे. कोलंबिया (Columbia) जिल्ह्यातील सुपरमार्केटसमध्ये 1.49 डॉलर्सला बिअर मिळते. यामुळे सुपरमार्केटमधील बिअर खरेदीच्या यादीत कोलंबिया 32 व्या क्रमांकावर आहे. वॉशिंग्टन डीसीमधील हॉटेल्समध्ये बिअरचा सरासरी दर 8 डॉलर आहे. अमेरिकेतील 13 शहरांमध्ये डीसीच्या तुलनेत अधिक दराने बिअर मिळते.

    First published:

    Tags: Price