पॅरिस, 9 एप्रिल : भारतातील हिजाब वाद
(Hijab Row) आता फ्रांसमध्येही पोहोचला आहे. रविवारी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हा मोठा मुद्दा झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मरीन ली पेन
(Marine Le Pen) यांनी जनतेला आश्वासन दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्या जर सत्तेत आल्या तर त्या हिजाब घालणाऱ्या मुस्लिमांकडून दंड आकारला जाईल.
काय म्हणाल्या ली पेन?
ली पेन म्हणाल्या की, त्यांच्या कायद्यांना भेदभाव करणारे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे संवैधानिक आव्हान दिले जाऊ शकते. अशी आव्हाने टाळण्यासाठी ती जनमत चाचणीची पद्धत अवलंबणार आहे.
आटीएल रेडिओसोबत (RTL Radio) बोलताना त्या म्हणाल्या की, ज्याप्रकारे वाहनांमध्ये सीटबेल्ट वापरणे सक्तीचे केले गेले आहे, त्याच्याप्रकारे मुस्लिम धर्मातील नागरिक सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरू शकत नाही, असा निर्णय लागू करण्यात येईल. त्या म्हणाल्या, ‘ज्याप्रकारे सीटबेल्ट न घातल्यावर दंड द्यावा लागतो, त्याचप्रकारे हिजाब घातल्यावर लोकांना दंड द्यावा लागेल. तसेच मला वाटते, पोलीस हा निर्णय लागू करायला सक्षम असतील.’
दरम्यान, फ्रांसमध्ये याआधीच शाळांमध्ये धार्मिक प्रतिकांवर प्रतिंबध लावण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यासही मनाई आहे.
ली पेन सत्तेच्या प्रबळ दावेदारांपैकी एक -
53 वर्षीय ली यांनी याधीच्या निवडणुकीत अप्रवाशी यांच्याविरोधात खूप घोषणाबाजी केली होती. मात्र, यावेळी त्यांनी घरातील मुद्द्यांवर अधिक लक्ष दिले आहे. पेन इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्या रणनीतीला चांगलीच टक्कर देत आहेत. राष्टपतिपदाच्या निवडणुकीत पेन या इमॅन्यएल मॅक्रॉन यांच्याविरोधात उभ्या आहेत. पेन यांनी काही दिवसांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्याकडे सत्तेचे प्रबळ दावेदारांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. 24 एप्रिलला होणारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा सामना हा मोठ्या हा चुरशीचा होऊ शकतो. 2017मध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ही निवडणूक जिंकली होती. तर शनिवारी मॅक्रॉन यांनी एका विशाल जनसभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, काहीच निश्चित नाही आणि काहीही होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.