नवी दिल्ली, 02 जुलै : यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेला बॉडीबिल्डर जो लिंडनरचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. वयाच्या 30 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. जो लिंडनरच्या अचानक जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. इतक्या कमी वयात लिंडनर जगाचा निरोप घेतला त्यामुळे अनेकजण शॉकमध्ये आहेत. एन्युरिझममुळे त्याचं निधन झाल्याचं समोर येत आहे. त्याच्या प्रेयसीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली. पुढे तिनं लिहिलं की, तिनं दिवसांपूर्वी तो माझ्या मिठीत होता. त्यानं सांगितलं की माझ्या मानेमध्ये दुखत आहे. पण खूप उशीर झाला होता. त्याने आपल्या चाहत्यांना प्रेरणा देण्यासाठी खूप काम केले आहे. तो लोकांना प्रेरणा देत होता म्हणून त्याला वाटले की तो आराम करू शकत नाही किंवा हार मानू शकत नाही. तो खूप गोड, दयाळू, खंबीर आणि कठोर परिश्रम करणारा एकनिष्ठ आणि प्रामाणिक माणूस होता. कोण होता 17 वर्षीय नाहेल? ज्याच्या हत्येने संपूर्ण फ्रान्स पेटलाय, आणीबाणीची स्थिती, पाहा PHOTO लिंडनरने अभिनेत्री रश्मिका मानधनाच्या पोगारू चित्रपटातही काम केले होतं. आता त्याच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांवर आणि कुटुंब मित्र परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सर्वजण तो गेल्याने शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, एन्युरिझम हा एक धोकादायक आजार आहे, ज्याला हिंदीमध्ये एन्युरिझम किंवा आर्टेरिओस्क्लेरोसिस असेही म्हणतात. हा आजार सामान्यतः मेंदू, पाय आणि ओटीपोटात होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.