जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / राजकारण सोडावं लागलेल्या माजी खासदाराशी पंगा घेणं Google ला पडलं महागात; न्यायालयाने ठोठावला दंड

राजकारण सोडावं लागलेल्या माजी खासदाराशी पंगा घेणं Google ला पडलं महागात; न्यायालयाने ठोठावला दंड

राजकारण सोडावं लागलेल्या माजी खासदाराशी पंगा घेणं Google ला पडलं महागात; न्यायालयाने ठोठावला दंड

एक वादग्रस्त व्हिडिओ (Controversial video) काढून टाकण्यात अपयशी ठरल्याने गुगललाच ऑस्ट्रेलियातल्या न्यायालयाने सुमारे 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    कॅनबेरा,  06 जून:  : सोशल मीडियावर (Social Media) काहीवेळा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचं आपण पाहतो. एखाद्या व्यक्तीवर टीका-टिप्पणी करणारे, तसंच धर्म, जाती आणि वर्णाविषयी चुकीचं भाष्य करणारे, सामाजिक सलोखा बिघडवण्यास कारणीभूत ठरणारे असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईदेखील होते. गुगलनं (Google) अनेकदा आक्षेपार्ह व्हिडिओसाठी युजर्सना दंड ठोठावल्याचं ऐकिवात आहे; पण एक वादग्रस्त व्हिडिओ (Controversial video) काढून टाकण्यात अपयशी ठरल्याने गुगललाच ऑस्ट्रेलियातल्या न्यायालयाने सुमारे 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुगल यूट्युबरचा वर्णद्वेषी आणि अपमानजनक व्हिडिओ हटवण्यात अपयशी ठरल्यानं, एका माजी खासदाराला राजकारण सोडावं लागलं, तसंच त्याच्या प्रतिमेला तडा गेला, असं निरीक्षण फेडरल न्यायालयानं नोंदवलं आहे. `रॉयटर्स`ने दिलेल्या वृत्तानुसार, यूट्युबवरील (YouTube) बदनामीकारक व्हिडिओ डिलीट न केल्यामुळे एका माजी खासदाराला मुदतीपूर्वीच राजकारण सोडावं लागलं. यासाठी गुगलने माजी खासदाराला 7,15,000 ऑस्ट्रेलियन डॉलरची (5,15,000 अमेरिकी डॉलर) भरपाई द्यावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 3 कोटी 99 लाख 95 हजार 183 रुपये होते. तसंच या प्रकरणी गुगलचं वर्तन हे अन्यायकारक आणि चुकीचं होतं, असंदेखील न्यायालयानं म्हटलं आहे. इतकं कॉलेज तुम्ही तरी केलंय का? वर्षभर ऑनलाइन लेक्चर्सना उपस्थित राहून मांजर झाली Graduate कंटेंट शेअरिंग वेबसाईट यूट्युबची मालक अल्फाबेट आयएनसीने न्यू साउथ वेल्सचे (New South Wales) तत्कालीन डेप्युटी प्रीमियर यांच्यावर हल्ला करण्याबाबतचे दोन व्हिडिओ प्रसारित करून पैसे कमवले. ही पोस्ट 2020 या वर्षाच्या अखेरीस करण्यात आली होती. तेव्हापासून ऑस्ट्रेलियातल्या (Australia) सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स या राज्यातल्या सुमारे 8,00,000 लोकांनी ही पोस्ट पाहिली, असं फेडरल न्यायालयाच्या (Federal Court) निदर्शनास आलं. याबाबत न्यायाधीश स्टीव रेयर्स म्हणाले, ``राजकीय समालोचक जॉर्डन शॅंक्स यांच्या व्हिडिओनं जॉन बॅरिलारो (John Barillaro) यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांअभावी त्यांना भ्रष्ट घोषित करण्यात आलं. त्यांच्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली. तसंच अपशब्दही वापरण्यात आले.`` ``गूगल आणि जॉर्डन शॅंक्स यांच्या मोहिमेमुळे दुखावलेले जॉन बॅरिलारो हे ऑक्टोबर 2021 राजकारणातून बाहेर पडले. तसंच त्यांची प्रतिमादेखील डागाळली. या संपूर्ण प्रकरणात गुगलचं वर्तन चुकीचं आणि अन्यायकारक होतं. त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे,`` असं न्यायाधीश रेयर्स यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात गुगललाच 3 कोटी 99 लाख 95 हजार 183 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने सध्या या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात