• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • 58 वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकावरून झालं होतं मुलाचं अपहरण, इतक्या वर्षांनी दिसताच क्षणी वृद्ध वडिलांनी मुलाला ओळखलं

58 वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकावरून झालं होतं मुलाचं अपहरण, इतक्या वर्षांनी दिसताच क्षणी वृद्ध वडिलांनी मुलाला ओळखलं

58 वर्षांपूर्वी बाप आणि मुलाची ही जोडी रेल्वे स्थानकावरून तुटली होती. यानंतर वडिलांनी आपला मुलगा हरवल्याबाबत तक्रार दाखल केली. पण, इतक्या वर्षात काही केल्या त्यांना त्यांचा मुलगा सापडत नव्हता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 जून: जगातील मुलांच्या तस्करीबद्दल (Child Trafficking) बोलायचे झाल्यास चीन यामध्ये आघाडीवर आहे. चीनमध्ये लहान मुलांच्या तस्करीची अनेक प्रकरणे नोंदली जातात. या देशात औद्योगिक क्षेत्र (Industrial Sector) मोठ्या प्रमाणात असल्यानं मुलांचे अपहरण करून येथील कारखान्यात मजूर म्हणून काम करायला लावले जाते. यासाठी अनेक टोळ्या चीनमध्ये मुलांचे अपहरण करतात. अशी अपहरण झालेली निम्म्याहून अधिक मुलं कधीही त्यांच्या आई-वडिलांना भेटूच शकत नाहीत. मात्र, अशाच एका मुलाची त्याच्या वडिलांसोबत झालेली भेट उपस्थितांचं मन हेलावून टाकणारी होती. चीनमध्ये एका 90 वर्षीय व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्यक्ती तब्बल 58 वर्षांनंतर आपल्या मुलाला भेटला. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मुलाच्या शोधात असलेल्या या वडिलांना मुलगा दिसल्यानंतर त्यांना रडू कोसळलं. 58 वर्षांपूर्वी बाप आणि मुलाची ही जोडी रेल्वे स्थानकावरून तुटली होती. यानंतर वडिलांनी आपला मुलगा हरवल्याबाबत तक्रार दाखल केली. पण, इतक्या वर्षात काही केल्या त्यांना त्यांचा मुलगा सापडत नव्हता. आता 58 वर्षांनंतर वडील आणि मुलाची भेट झाली. लुओ असे या वडिलांचे नाव असून मुलाचे नाव फू असे आहे. फू दोन वर्षांचा असताना रेल्वे स्थानकावरून त्यांची ताटातूट झाली. आता दोघे एकमेकांना भेटल्यानं खूप आनंदी आहेत, लुओ आता 90 वर्षांचे आहेत. ही भेट चीनच्या शेडोंग प्रांतात झाली. येथील शहर सार्वजनिक विभागाकडून या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. कित्येक वर्षात आपल्या मुलाला पाहिलेले नसतानाही त्यांनी मुुलाला ओळखल्याचे क्लिपमध्ये दिसत आहे. मुलाचे अपहरण करून विक्री केली गेली इतक्या वर्षानंतर आपल्या वडिलांना भेटल्याने फू आनंदी आहे. त्यानं सांगितले की, जेव्हा तो दोन वर्षांचा होता तेव्हा त्याची स्थानकावरून कुणीतरी चोरी केली. लुओ यांनी स्थानकावर थोडावेळ आपल्या मुलाचा हात सोडला होता आणि तितक्यात एका चोरट्यानं त्याला चोरले. यानंतर चोरांच्या टोळीनं त्याला एका जोडप्याला विकलं. लुओ हे आपल्या मुलाला विसरू शकले नाहीत आणि तो गायब झाल्यानंतरही वर्षानुवर्षे त्याला शोधत राहिले. यानंतर अखेर 2015 मध्ये डीएनए चाचणी तंत्रज्ञानाद्वारे त्यांना फू सापडला. चीनमध्ये मुलांच्या तस्करीची गंभीर परिस्थिती फूने सांगितले की, ज्या पालकांनी त्याला दत्तक घेतले त्या पालकांना माझी चोरी झाली होती याची माहिती नव्हती. आता तो आपल्या वडिलांना भेटून खूप आनंदी झाला आहे. चीनमध्ये बाल तस्करीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने कठोर पावले उचलली आहेत. तसेच, एका मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1680 मुले त्यांच्या पालकांना परत मिळाली आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: