मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सौदी अरेबियाच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, 8 जण गंभीर जखमी

सौदी अरेबियाच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, 8 जण गंभीर जखमी

 सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) विमानतळ परिसरात (Airport) झालेल्या ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) 8 जण गंभीर जखमी (8 injured) झाले आहेत.

सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) विमानतळ परिसरात (Airport) झालेल्या ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) 8 जण गंभीर जखमी (8 injured) झाले आहेत.

सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) विमानतळ परिसरात (Airport) झालेल्या ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) 8 जण गंभीर जखमी (8 injured) झाले आहेत.

vरियाध, 31 ऑगस्ट : सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) विमानतळ परिसरात (Airport) झालेल्या ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) 8 जण गंभीर जखमी (8 injured) झाले आहेत. या हल्ल्यात एका प्रवासी विमानाचंदेखील (Passenger flight) मोठं नुकसान झालं असून येमेनमधून (Yemen) हा ड्रोन हल्ला झाला असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. येमेनमधील हुती बंडखोरांविरोधात सौदी अरेबिया सध्या लढत असून त्यातूनच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय सौदी अरेबियाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

येमेनमधील शिया समर्थक आणि सौदी अरेबिया यांच्यात 2015 सालापासून संघर्ष सुरू आहे. येमेनवर ताबा मिळवू पाहणाऱ्या हुती बंडखोरांना इराणनं पाठिंबा दिला आहे. तर सौदी अरेबियानं या बंडखोरांविरोधात आपलं सैन्य येमेनमध्ये पाठवलं आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर येमेनमधील बंडखोरांकडून सौदी अरेबियातील संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्यात येत असल्याचं चित्र वारंवार दिसत आहे. सौदी अरेबियातील विमानतळावर झालेला हा हल्ला गेल्या 24 तासांतील दुसरा हल्ला आहे. या हल्ल्यात 8 नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सौदी बंडखोरांकडून लक्ष्य

येमेनमधील बंडखोरांनी फेब्रुवारी महिन्यात सौदी अरेबियातील आभा विमानतळाला लक्ष्य केलं होतं. आभा हे सौदी अरेबियातील महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्या हल्ल्यात एका प्रवासी विमानाने पेट घेतला होता.

हे वाचा - वनसमितीचा सदस्यच करत होता वाघांची शिकार, अवयव तस्करी करताना ठोकल्या बेड्या

दोन ड्रोन केले निकामी

या हल्ल्याच्या वेळी बॉम्ब असणारे आणखी दोन ड्रोन येमेनच्या दिशेने धाडण्यात आले होते. मात्र त्याचा स्फोट होण्यापूर्वीच ते निकामी करण्यात सौदी अरेबियाला यश मिळालं आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचं सांगितलं जात आहे. एका ड्रोनमधील बॉम्ब फुटल्यामुळे विमानतळ परिसरात छोटी आग लागली होती. ती विझवण्यात यश आलं असून या हल्ल्यात कुणीही मृत्युमुखी पडलेलं नसल्याचं सौदी अरेबियाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Attack, Drone shooting, Saudi arabia