जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Shocking! फर्टिलिटी डॉक्टरने महिलांना दिला धोका, 14 वेळा वापरला स्वतःचाच स्पर्म

Shocking! फर्टिलिटी डॉक्टरने महिलांना दिला धोका, 14 वेळा वापरला स्वतःचाच स्पर्म

Shocking! फर्टिलिटी डॉक्टरने महिलांना दिला धोका, 14 वेळा वापरला स्वतःचाच स्पर्म

प्रेग्नन्सीसाठी फर्टिलिटी सेंटरमध्ये येणाऱ्या महिलांना डॉक्टर स्वतःचाच स्पर्म देऊन प्रेग्नंट करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 4 जानेवारी: एका फर्टिलिटी डॉक्टरने (Fertility doctor) अनेक महिलांना (Women) धोका देत (Cheating) त्यांच्या पतीऐवजी स्वतःचेच स्पर्म (Self sperm) वापरून प्रेग्नंट (Pregnant) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जी जोडपी नैसर्गिकरित्या आईवडील बनू शकत नाहीत, ती जोडपी फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन प्रेग्नन्सीसाठी मदत घेत असतात. यावेळी महिलेच्या शरीरात तिच्या पतीचे किंवा डोनरचे स्पर्म प्लँट करण्यात येतात आणि महिलेला प्रेग्नंट केलं जातं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या धक्कादायक घटनेत डॉक्टरनं महिलांना कुठलीही कल्पना न देता यासाठी स्वतःचेच स्पर्म वापरल्याचं समोर आलं.   असे वापरले स्पर्म डॉ. पॉल जोन्स हा एक प्रसिद्ध फर्टिलिटी डॉक्टर होता. अनेक जोडपी घरात पाळणा हलण्याची आशा घेऊन त्यांच्याकडे येत असत. मात्र विकृत असणाऱ्या या डॉक्टरने महिलांना प्रेग्नंट करण्यासाठी स्वतःचेच स्पर्म वापरले. एका टीव्ही शो दरम्यान ही घटना उघड झाली असून त्यामुळे या सर्व जोडप्यांना आणि त्यांच्या मुलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. अशी झाली पोलखोल ‘डेली स्टार’नं दिलेल्या बातमीनुसार सिमंस आणि ताहनी स्कॉट या दोन बहिणींनी एका न्यूज प्रोग्रॅममध्ये या बाबीचा उलगडा केला. त्यांचे वडील जॉन इमंस आणि आई चेरिल इमंस यांना मूल होत नसल्यामुळे ते डॉ. पॉल जोन्स यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःचा स्पर्म वापरत चेरिल यांना प्रेग्नंट केलं होतं, असा दावा या बहिणींनी केला.   हे वाचा -

अशी मिळाली माहिती Ancestry.com नावाच्या एका वेबसाईटमुळे याचा शोध लागला. या बेवसाईटवर अनेकजण स्वतःचं कूळ आणि पूर्वज यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेकांनी आपले डीएनए रिपोर्ट तिथं अपलोड केलेले असतात. त्यातून काही व्यक्तींना असा शोध लागला की जवळपास 12 जणांचे डीएनए रिपोर्ट काही प्रमाणात जुळत असून त्यांचे वडील डॉ. जोन्स हेच असल्याचं समोर येत होतं. हे समजल्यावर दोघींना जबर धक्का बसला. वयाच्या 38 व्या वर्षी हा धक्का पचवणं अवघड होतं, असं या दोघींनी म्हटलं आहे.   दरम्यान, डॉ. जोन्स यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून त्यांचं मेडिकल लायसन्स अगोदरच रद्द करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात