कराची, 9 जून : पाकिस्तानी (Pakistan News) खासदार आमीर लियाकत यांचा (MP Amir Liaquat dies) कराचीमध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जियो टीव्हीने त्यांच्या घर कामगाराच्या हवाल्याने ही माहिती दिली. ते कराची स्थित आपल्या घरात
मृतावस्थेत
सापडले. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आमीर लियाकत सध्या दुसऱ्या पत्नीकडून घटस्फोट आणि तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत होते. आमीर लियाकत हे अवघ्या 49 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 1972 रोजी कराचीत झाला होता. आमीर लियाकत यांनी तीन लग्न केली होती. दुसऱ्या पत्नीसोबत 2018 मध्ये ते लग्नबंधनात अडकले होते. तिच्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर 2022मध्ये 31 वर्षांनी लहान तरुणी दानिया शाह हिच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर 18 वर्षीय दानियाने त्याच्याकडे घटस्फोट मागितला गोता. बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. यानंतर ते वेदनेने ओरडले, यानंतर त्यांच्या घरी काम करणारा तरुण तेथे पोहोचला. मात्र खोलीचं दार आतून बंद होता. कसंबसं त्याने दार तोडलं तर खासदार खोलीत बेशुद्धावस्थेत पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, येथेच त्यांना मृत्यू झाला.
खासदार दुसऱ्या पत्नीसह आणि उजव्या बाजूला तिसरी पत्नी
आमीर लियाकत 2018 मार्चमध्ये इम्रान खानच्या पार्टीत सामील झाले होते. यानंतर ते कराचीचे खासदार बनले. यानंतर मात्र त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. तिसऱ्या लग्नाच्या काही दिवसात पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्यानंतर खासदार तणावात असल्याचंही सांगितलं जात आहे.