Home /News /videsh /

COVID19: जर्मनीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता, जगात मृतांचा आकडा गेला 2.50 लाखांवर

COVID19: जर्मनीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता, जगात मृतांचा आकडा गेला 2.50 लाखांवर

Representative Image

Representative Image

रशियात एकाच दिवसात तब्बल 10 हजार 581 नवे रुग्ण सापडले आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.

    बॉन 04 मे: कोरोनावर जर्मनीने मोठं यश मिळवलं असं सांगितं जात असतानाच चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. जर्मनीत जो आकडा सांगितला जातो त्यापेक्षा 10 पट जास्त रुग्ण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉन विद्यापीठाच्या संशोधकांनी यावर अहवाल तयार केला आहे. शहरी भागात ट्रेसिंग करण्यात आलं असलं तरी ग्रामीण भागात अतिशय कमी प्रमाणात टेस्ट केल्या गेल्या असं त्यात म्हटलं आहे. त्यामुळे जर्मनीत पुन्हा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातला कोरोना मृत्यूचा आकडा अडीच लाखांच्या जवळ गेला आहे. 2 लाख 48 हजार 653 जणांचा मृत्यू झालाय. तर 35 लाख 84 हजार 116 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 11 लाख 61 हजार 677 लोक बरे झाले आहेत. रशियात एकाच दिवसात तब्बल 10 हजार 581 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 01 लाख 45 हजार 268 एवढी झाली आहे. राजधानी मॉस्कोमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी विषाणूची लागण चीनच्या लॅबमधून पसरल्याचा मोठा पुरावा मिळाला असल्याचे सांगितले. मात्र माइक यांनी माध्यमांना कोणतेही पुरावे दिले नाहीत. हे वाचा - 2 वर्षे तरी कोरोनाव्हायरसला रोखणं शक्य नाही, तज्ज्ञांचा दावा जगातील अनेक देश वुहानमधील चिनी प्रयोगशाळांकडे संशयानं पाहत आहेत. या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूवर संशोधन करण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले होते, मात्र चीनने असे सर्व आरोप फेटाळून लावले होते.  आता पहिल्यांदाच अमेरिकेनं चीननं कोरोना पसरवल्याचे पुरावे असल्याचे सांगितले. हे वाचा- ‘आम्ही फक्त मरणाची वाट पाहतोय’, या देशात कोरोनाच्या ‘त्सुनामी’ची शक्यता एबीसी न्यूजनं घेतलेल्या मुलाखतीत माइक पोम्पियो यांनी, चीनवर कोरोना पसरवल्याचा आरोप करत पुराव्याबाबतही सांगितले. याआधी त्यांनी सांगितले होते की, अमेरिका चीनच्या वुहानमधील लॅबमधून कोरोना कसा पसरला याचा शोध घेत आहे. माइक यावेळी असेही म्हणाले की, "आम्हाला सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे. मी तुम्हाला सांगतो की वुहानमधील लॅबमध्ये कोरोनावर संशोधन सुरू असताना हा व्हायरस पसरला. चीननं याबाबत सर्व माहिती लपवली. त्याचा परिणाम आता साऱ्या जगाला भोगावे लागत आहे".
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या