बीजिंग, 10 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसनं चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगात दहशत पसरवली आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 904 जण दगावले आहेत. अधिकृत आकडा एफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोना व्हायरसची 40 हजार रुग्णांना लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चीन सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव वाढल्याची चर्चा सुरू आहे. जेव्हा वुहानमध्ये कोरोना व्हायरस पसरत होता, तेव्हा सरकारी पातळीवर एकमेकांवर जबाबदारी टाकली जात असल्याचे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. मात्र सरकारने व्हायरस पसरण्यामागे जनतेलाच जबाबदार धरलं आहे. चीन सरकार कोरोना व्हायरसला रोखण्यात अपयशी ठरले आहे. याशिवाय भारतातही केरळमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले तीन रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे.
China virus deaths jump to 902, reports AFP news agency quoting official. #CoronaVirus
रविवारी चीनच्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मृतांची संख्या 803 वर पोहोचली होती. ही संख्या 2002-2003 साली पसरलेल्या एसएआरएस (SARS) या विषाणूंच्या मृतांपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर ही संख्या सर्वाधिक मानली जात होती. तीव्र श्वसन सिंड्रोममुळे 2002-2003 साली 747 लोकांचा मृत्यू झाला होता. हुबेईच्या आरोग्य विभागानेही आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये मध्य प्रातांतील आणखी 2,177 नव्या प्रकरणांची पुष्टी केली आहे. आता संपूर्ण चीनमध्ये 36,690 हून अधिक पुष्टी केलेली प्रकरणे आहेत.