चीनी सरकारी मीडिया ग्लोबल टाइ्म्सने ट्विट करून ही माहिती दिली आहे की, चीनी शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी शस्त्र तयार केलं आहे. चीनने दावा केला आहे, त्यांनी असं नॅनोमटेरिअल तयार केलं आहे, जे शरीरात प्रवेश करेल आणि कोरोनाव्हायरसला शोषून घेईल आणि त्यानंतर 96.5 ते 99.9 टक्के यशस्वीरित्या निष्क्रिय करण्यात सक्षम आहे. हे वाचा - Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो? तज्ज्ञांच्या मते हे औषध नाही आणि लसही नाही. तर एकप्रकारे बायोव्हेपन आहे जे कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे. काय आहे नॅनोमटेरिअल? नॅनोमटेरियअल हे अनेक प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये वापरले जातात. हेल्थकेअरव्यतिरिक्त पेंट्स, फिल्टर्स, इन्सुलेशन आणि लुब्रिकेंटसाठीदेखील याचा वापर होतो. हेल्थकेअरचा विचार करता याला नॅनोजाइम्सही म्हणतात आणि हे शरीरातील एन्झाइम्सप्रमाणेच काम करतात. अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या मते, नॅनोमटेरिलबाबत अद्याप कुणाला पुरेशी माहिती नाही. यांना विशेष कामांसाठी तयार केलं जातं. हे नॅनोमटेरिअल शरीरात सहजरित्या प्रवेश करू शकतात कारण ते खूपच लहान असतात. NIH च्या मते, नॅनोटेक्नोलॉजीचा वापर औषध बनवण्यासाठीही होऊ शकतो. हे शरीरात आजार पसरवणाऱ्या पेशींना लक्ष्य करतात. उदा. कॅन्सर पेशी. फक्त जलद उपचार नाही तर इतर थेरेपींच्या तुलनेत खूपच सुरक्षित मानलं जातं. मात्र तरीही त्याच्या वापरावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हे वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी 'या' देशाचा हायटेक प्लॅन, शहरभर लावले 1 लाख CCTVChinese scientists have developed a new weapon to combat the #coronavirus. They say they have found a nanomaterial that can absorb and deactivate the virus with 96.5-99.9% efficiency. pic.twitter.com/ESFUOoTuIX
— Global Times (@globaltimesnews) March 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus