बीजिंग 21 फेब्रुवारी : चीनमध्ये (China) कोरोनाव्हायरस (Coronavirus) फक्त रुग्णांच (Patient) नाही तर अशा डॉक्टरांचाही (Doctor) जीव घेतो आहे, जे या रुग्णांवर दिवसरात्र झटून उपचार करत आहेत. व्हायरसचं इन्फेक्शन रुग्णांमार्फत डॉक्टरांमध्ये पसरत आहे. कित्येक डॉक्टर कोरोनाव्हायरचे शिकार झालेत. आणखी एका तरुण डॉक्टराने आपला जीव गमावला आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरने कोरोनाव्हायरस रुग्णांच्या उपचारासाठी आपलं ठरलेलं लग्नही पुढे ढकललं होतं.
The guardian ने दिलेल्या वृत्तानुसार, वुहानमध्ये 29 वर्षांच्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. वुहानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पेंग येन्हुआ (Peng Yinhua) हे जिआंगझिआ रुग्णालयात (Jiangxia district’s First People’s Hospital) रुग्णसेवा देत होते. कोरोनाच्या रुग्णांना उपचार देताना त्यांनाही कोरोनाव्हायरस झाला. 25 जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 30 जानेवारीला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यावेळी त्यांच्यावर जिनियंतन रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. गुरुवारी (20 फेब्रुवारी) रात्री 9.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
हेदेखील वाचा - बापरे! जेलमध्ये घुसला कोरोनाव्हायरस आणि अधिकाऱ्यांची गेली नोकरी
रुग्णालयाच्या संचालकाचा कोरोनाने घेतला जीव
याधी 18 फेब्रुवारीला वुहान (Wuhan) मधील वुचांग हॉस्पिटलचे संचालक डॉ. लियु झिमिंग (Liu Zhiming) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चीनच्या स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लियु झिमिंग हे कोरोनाव्हायरसवर उपचार करण्यासाठी दिवसरात्र काम करत होते. लोकांचा जीव वाचवता वाचवता त्यांना कधी कोरोनाची लागण झाली याची कल्पना त्यांनाही आली नाही.
जगाला 'कोरोना'चा इशारा देणाऱ्या डॉक्टरचाच बळी
रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशिवाय ज्या डॉक्टरने जगाला सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसच्या संभाव्य प्रकोपाबद्दल सावध केलं होतं. त्यांनाच कोरोना व्हायरनं आपली शिकार बनवलं. चीनी डॉक्टर ली वेनलियांग (Li Wenliang) यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला कोरोना व्हायरसबद्दल जगाला सावध केलं होतं. त्यांच्या या इशाऱ्याला कुणी गांभीर्यानं घेतला नाही. अन् 6 फेब्रुवारीला वुहानमध्ये डॉक्टर ली वेनलियांग यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.
हेदेखील वाचा - Coronavirus : जगाला 'कोरोना'चा इशारा देणाऱ्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी
चीनमध्ये आतापर्यंत एकूण 2,100 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 74,000 जणांचा याची लागण झाली आहे. हुबेई प्रांत आणि त्यातही वुहानमध्ये सर्वाधिक प्रकरणं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus, Doctor's death