अमेरिकेतलं कॅलिफोर्निया ( California ) राज्य सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. Bomb Cyclone मुळे हाहाकार माजला आहे.
Bomb Cyclone म्हणजे वातावरणातल्या ठराविक रचनेमुळे निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती. या वायुमंडलामुळे चक्रीवादळासारखं वातावरण आहे आणि जोरदार पाऊस सुरू आहे.
बॉम्बस्फोट जसा एकदम अचानक होतो आणि विद्ध्वंस करतो तसाच वातावरणाचा तडकाफडकी होणारा मोठा बदल म्हणजे बॉम्ब सायक्लॉन. कॅलिफॉर्नियात atmospheric river आमि bomb cyclone दोन्ही एका वेळी होत आहे.
ज्यावेळेस वातावरणात असे मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतात, त्यावेळेस त्या हवेच्या वरच्या स्तरात बदल होतो. ही वादळं साधारण 24 तासांपर्यंत मर्यादित असतात. तीव्रता अधिक असते.
कॅलिफोर्नियाच्या Bomb Cyclone मुळे मोठं नुकसान झालं आहे. काही तासांत प्रचंड पाऊस यामुळे फ्लॅश फ्लडचा धोका आहे. त्यामुळे अमेरिकेत या भागात हाहाकार उडाला आहे.
कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ रिसर्च च्या म्हणण्यानुसार, Bomb Cyclone आणि या Atmospheric River य़ाचा एकत्र परिणाम येथील स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.
उत्तर कॅलिफोर्निया आणि पॅसिफिच्या वायव्य भागात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. ताशी 97 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय समुद्राच्या लाटा 20 फूट उंचीपर्यंत उसळू शकतात, आणि त्याच वेगात किनाऱ्यावर धडकू शकतात.
बऱ्याच काळानंतर कॅलिफोर्नियामध्ये Bomb Cyclone आलं आहे. जीवितहानी वाचवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था काम करत आहे.