जालियनवाला बाग हत्याकांड: इंग्लंडच्या PM थेरेसा मे यांनी खेद व्यक्त केला!

जालियनवाला बाग हत्याकांड: इंग्लंडच्या PM थेरेसा मे यांनी खेद व्यक्त केला!

भारतावरील राजवटीत पंजाबमधील जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडप्रकरणी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी खेद व्यक्त केला आहे.

  • Share this:

लंडन, 10 एप्रिल: भारतावरील राजवटीत पंजाबमधील जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडप्रकरणी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी खेद व्यक्त केला आहे. तेव्हा जे काही झाले त्याबद्दल आम्हाला खेद आहे, त्या घटनेचे आम्हाला दु:ख आहे, असे मे संसदेतील भाषणात म्हणाल्या.

पंजाबमधील अमृतसर शहरात 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश सैन्यातील जनरल रेजिनाल्ड डायर याने जालियनवाला बागेत जमलेल्या लोकांवर गोळीबार केला. जनरल डायरच्या आदेशावर निशस्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1 हजार 600 फैरी झाडण्यात आल्या होत्या. हे सर्व जण शांततेच्या मार्गाने रॉलेट अॅक्टचा विरोध करण्यासाठी जमा झाले होते. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या हत्याकांडामध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा 1,000 हून अधिक आहे.

पंतप्रधान मे यांनी ब्रिटनच्या संसदेत बोलताना जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त केला. येत्या 13 तारखेला जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत.

अर्थात मे यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही. पण संसदेतील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीने मे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. सभागृहातील लेबर पक्षाचे जेरेमी कॉर्बिन यांनी सरकारने या संदर्भात पूर्ण आणि स्पष्ट शब्दात माफी मागावी अशी मागणी केली. याआधी 2013मध्ये तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमरन यांनी भारत दौऱयात लियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांड लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. पण त्यांनी देखील मे यांच्या प्रमाणे माफी मागितली नव्हती.

VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले

First published: April 10, 2019, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading