लंडन, 29 डिसेंबर : ब्रिटनच्या (Britain) काही तज्ज्ञांनी (Experts) काही दिवसांपूर्वी काळजी व्यक्त केलीय, की रशिया (Russia) घातक इबोला व्हायरसच्या (Ebola Virus) माध्यमातून जैविक अस्त्र (biological weapon) बनवण्याबाबत संशोधन करतो आहे.
डेली मेलनं दिलेल्या
वृत्तानुसार असं मानलं जात आहे, की मॉस्कोची (Moscow) गुप्तहेर संस्था FSB ही युनिट - 68240 या सांकेतिक नाव असलेल्या प्रकल्पावर काम करते आहे. ब्रिटनमध्ये 2 वर्षांपूर्वी रशियन गुप्तहेर आणि त्यांची मुलगी या दोघांवर नोविचोक रसायनाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला केला गेला होता. या घटनेचे धागेदोरे FSB युनिट - 68240 सोबत जोडलेले होते.
एनजीओ ओपन फॅक्टोच्या (open facto) हेरांना कळालं आहे, की रशियाच्या रक्षा विभागात एक सिक्रेट युनिट बनवून ठेवलेलं आहे. त्याचं नाव आहे 48 वं सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट. हे युनिट अतिशय घातक विषाणूचा अभ्यास करत आहे. या इन्स्टिट्यूटचा संबंध ३३ व्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटसोबतही आहे. याच इन्स्टिट्यूटनं जीवघेणा नर्व्ह एजंट नोवीचोक बनवला होता. बातमीनुसार, अमेरिकेनं दोन्ही इन्स्टिट्यूट्सवर बंदी आणली आहे.
रशियाच्या संरक्षण विभागाचं 48 वं सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट FSB युनिट - 68240 ला डेटा पुरवत असतं. हे युनिट Toledo ला पुढे घेऊन जात आहे. ब्रिटिश वृत्तपत्र 'The Mirror'ला एका सूत्रानं सांगितलं, की रशिया आणि ब्रिटन दोघेही जीवशास्त्रीय आणि रासायनिक हत्यारांचा अभ्यास प्रयोगशाळांच्या माध्यमातून करत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये नॉवीचोक सारख्या हल्ल्यांपासून बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.
याच महिन्यात ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनीही दावा केला, की रशियाकडे ब्रिटनच्या रस्त्यांवरील हजारो लोकांना काही सेकंदातच मारण्याची क्षमता आहे. ब्रिटनच्या सैन्याच्या गुप्त सूत्रांनुसार, रशियाचं सरकार वायरसमुळे होणाऱ्या आजारांपलिकडे जात अजून बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करू शकतं.
असं मानलं जात आहे, की रशियाचं स्पेशल युनिट इबोलासोबतच अजून एक घातक विषाणू मारबर्गवरसुद्धा संशोधन करत आहे. या विषाणूच्या संपर्कात येणाऱ्या 88 टक्के लोकांचा मृत्यू होतो. 1967 साली जर्मनी आणि सर्बियामध्ये मारबर्ग विषाणू पसरल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.