मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर सिंहासन कोणाला? कॅमिलाना मिळणार नाही राणी व्हायचा मान, कारण...

क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर सिंहासन कोणाला? कॅमिलाना मिळणार नाही राणी व्हायचा मान, कारण...

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे, त्या 96 वर्षांच्या होत्या. क्वीन एलिझाबेथ या सर्वाधिक काळ ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या राजगादीवर कोण बसणार? पुढचा राजा आणि राणी कोण होणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

लंडन : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे, त्या 96 वर्षांच्या होत्या. क्वीन एलिझाबेथ या सर्वाधिक काळ ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. 1952 साली एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज सहावे यांचे निधन झाल्यानंतर एलिझाबेथ राणी झाल्या. 2015 साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार क्वीन एलिझाबेथ या ब्रिटनच्या इतिहासातल्या सर्वोत्तम सम्राट होत्या. क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या राजगादीवर कोण बसणार? पुढचा राजा आणि राणी कोण होणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) हे राजा (Prince Charles) बनण्याच्या प्रक्रियेत सगळ्यात पुढे आहेत. प्रिन्स चार्ल्स हे राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांचे सगळ्यात मोठे पूत्र असल्यामुळे सिंहासनावर बसण्याचा मान त्यांना मिळेल. सिंहासनावर बसल्यानंतर प्रिन्स चार्ल्स यांना किंग चार्ल्स तिसरे म्हणून संबोधलं जाईल. ब्रिटनचा राजा होण्यासाठी प्रिन्स चार्ल्स यांना सर्वाधिक काळ वाट पाहावी लागली आहे. प्रिन्स चार्ल्स हे सध्या 73 वर्षांचे आहेत. प्रिन्स चार्ल्स यांची आई एलिझाबेथ या वयाच्या 25 व्या वर्षीच क्वीन झाल्या होत्या. प्रिन्स चार्ल्स राजा झाले तर ते ब्रिटनच्या इतिहासातले सगळ्यात वयस्कर सम्राट असतील.

प्रिन्स विलियम पुढचे राजा?

प्रिन्स चार्ल्स सिंहासन न स्वीकारता हे पद आपला मोठा पूत्र प्रिन्स विलियम यांना देतील, कारण प्रिन्स चार्ल्स यांना राजा व्हायची इच्छा नाही, अशी वृत्तही ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाली होती, पण यावर राजघरण्यातल्या कोणीच स्पष्टीकरण दिलं नव्हतं. प्रिन्स चार्ल्स यांनी पदाचा त्याग केला तर मात्र गुंतागुंत वाढू शकते.

प्रिन्स चार्ल्सनी सिंहासन स्वीकारलं नाही तर प्रिन्स विलियम राजा

नेहमीच्या प्रक्रियेनुसार राणीच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स राजा होतील, पण प्रिन्स चार्ल्स यांनी राजा व्हायला नकार दिला तरच प्रिन्स विलियम यांना राजा होता येईल. सिंहासनाचा वारसदार रॉयल फॅमिलीच्या सदस्यांच्या सिक्वेन्सनुसार ठरतो. हा सिक्वेन्स ब्रिटनच्या संसदेने केलेल्या कायद्यानेही नियंत्रित केलेला असतो.

प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे राजा झाले तरी कॅमिलांना मिळणार नाही राणीचा मुकूट

प्रिन्स चार्ल्स राजा झाले तर कॅमिला राणी?

2005 साली कॅमिला यांनी जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांच्याशी लग्न केलं तेव्हा कॅमिला राणी होणार नाहीत तर फक्त प्रिन्स चार्ल्सच्या पत्नीच राहतील, असं बोललं गेलं. प्रिन्सेस डायना यांच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स यांनी कॅमिला यांच्याशी विवाह केल्यामुळे ब्रिटनच्या नागरिकांमध्ये संशय आणि नाराजी होती, त्यामुळे तेव्हाही कॅमिला राणी होणार नाहीत, असं सांगितलं जात होतं.

प्रिन्स चार्ल्स जेव्हा राजा होतील तेव्हा कॅमिला (डचेस ऑफ कॉर्नवॉल) यांना राणी व्हायचा मान मिळणार नाही, तर त्या फक्त क्वीन कनसॉर्ट म्हणजेच त्यांना फक्त राजाच्या पत्नीचा मान मिळेल, असं क्वीन एलिझाबेथ यांनी याचवर्षी जाहीर केलं होतं. याआधी ब्रिटनच्या राजघराण्यात राजाच्या पत्नीला राणीचा मान मिळायचा, पण राणी सिंहासनावर विराजमान असेल तर तिच्या नवऱ्याला राजा हे पद मिळत नाही, याच कारणामुळे क्वीन एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप (ड्यूक ऑफ एडनबर्ग) यांना कधीच राजा ही पदवी मिळाली नाही.

First published: