नर्सला मिळाली नाही PPE किट, रुग्णावर उपचार करताना कोरोनाने ग्रासलं

नर्सला मिळाली नाही PPE किट, रुग्णावर उपचार करताना कोरोनाने ग्रासलं

बेकी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करायच्या त्या हॉस्पिटलकडे त्यावेळी PPE किट पुरेश्या संख्येत उपलब्ध नव्हते त्यामुळे बेकी यांना ते मिळालं नाही.

  • Share this:

लंडन 12 एप्रिल : कोरोनावर उपचार करताना सगळ्यात कसोटी लागली ती काम करणारे डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफची. जगभर त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. आपलं घर दार सोडून ही मंडळी दिवस रात्र लोकांचे जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. ब्रिटनमधल्या अशाच एका नर्सची कहाणी सगळ्यांच्या आदराचा विषय ठरली. मात्र त्या नर्सला सध्या मृत्यूशी झुंझ द्यावी लागत आहे. ‘द सन’ ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

बेकी उशेर असं त्या 38 वर्षीय नर्सचं नाव आहे. बेकी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करायच्या त्या हॉस्पिटलकडे त्यावेळी PPE किट पुरेश्या संख्येत उपलब्ध नव्हते त्यामुळे बेकी यांना ते मिळालं नाही. मात्र त्यामुळे त्यांनी आपलं काम न थांबवता त्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करत राहिल्या.

दोन दिवसांच्या सेवेनंतर अखेर त्यांना कोरोनाने ग्रासलं. ताप आला आणि श्वास घ्यायला त्रास जावू लागला. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. आता त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. बेकी यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. बेकीवर उपचार सुरू असताना आपण तिला बघायला किंवा भेटायला जावू शकत नाही याचंही त्यांना दु:ख आहे. या घटनेमुळे PPE किटच्या तुटवड्याचा विषयही ब्रिटनमध्ये चर्चेला जात आहे.

पाकिस्तानी मंत्र्याने चुकवलं Indiaचं स्पेलिंग,भारतीय म्हणाले-कहना क्या चाहते हो?

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांची प्रकृतीत सुधार आल्याने त्यांना आज (12 एप्रिल) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बोरिस यांना सोमवारी (6 एप्रिल) आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बोरिस जॉन्सन यांना 10 दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते.

अमेरिकेनं मोडला इटलीचा रेकॉर्ड, कोरोनामुळे आतापर्यंत 19,681 रुग्णांचा मृत्यू

अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी ते लगेच कामात रुजू होऊ शकत नाही. त्यांना पुढील काही दिवस सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. फॉरेन सेक्रेटरी डॉमिनिक रॅब यांनी नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयात दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल बोरिस यांनी धन्यवाद व्यक्त केले आहे.

 

 

First published: April 12, 2020, 11:25 PM IST

ताज्या बातम्या