मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या घरात घुसली कार, एकाला अटक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या घरात घुसली कार, एकाला अटक

ऋषी सुनक यांच्या डाउनिंग स्ट्रीटवर शिरली कार

ऋषी सुनक यांच्या डाउनिंग स्ट्रीटवर शिरली कार

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं घर आणि ऑफिस असलेल्या गेटमध्ये कार शिरून अपघात झाला आहे.

लंडन, 25 मे : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं घर आणि ऑफिस असलेल्या गेटमध्ये कार शिरून अपघात झाला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार लंडनच्या डाउनिंग स्ट्रीटच्या गेटमध्ये एका गाडीचा अपघात झाला, यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. डाउनिंग स्ट्रीट जगभरातल्या प्रसिद्ध जागेपैकी एक आहे, जिकडे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं घर आणि कार्यालय आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार कार गेटला आदळल्यानंतर अधिकाऱ्यांनी व्हाईटहॉल रोड बंद केला. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची गाडी दिसत आहे, जिचं बोनेट उघडलं आहे. ही गाडी गेटजवळ उभी आहे. हा अपघात आहे का घातपाताचा प्रयत्न आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

वेस्टमिंस्टर पोलिसांनी केलेल्या ट्वीटनुसार संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अपघातामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही.

First published:
top videos