मराठी बातम्या /बातम्या /विदेश /राणी एलिझाबेथनंतर 'कोहिनूर'च्या वारसदाराचं रहस्य वाढलं, वाचा कुणाला मिळणार मुकुट!

राणी एलिझाबेथनंतर 'कोहिनूर'च्या वारसदाराचं रहस्य वाढलं, वाचा कुणाला मिळणार मुकुट!

कोहिनूर मुकुट कुणाला मिळणार हा प्रश्न कायम आहे.

कोहिनूर मुकुट कुणाला मिळणार हा प्रश्न कायम आहे.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी (8 सप्टेंबर 2022) निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कोहिनूर मुकुटावर कोणाचा अधिकार असेल, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 9 सप्टेंबर : ब्रिटनवर (Britain) सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी (8 सप्टेंबर 2022) निधन झालं. वयाच्या 96 व्या वर्षी एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला. राणीच्या निधनानंतर आता त्यांच्या कोहिनूर मुकुटावर कोणाचा अधिकार असेल, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. खरं तर या वर्षाच्या सुरुवातीला राणीने स्वतःच 'डचेस ऑफ कॉर्नवॉल' (Duchess of Cornwall) कॅमिला यांना 'क्वीन कन्सोर्ट' (Queen Consort) म्हणून ओळखलं जावं, अशी घोषणा केली होती. त्यामुळे प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी कॅमिला यांना प्रसिद्ध कोहिनूर ताज मिळू शकतो, असं म्हटलं जात आहे.

    काय आहे इतिहास?

    क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या राज्यारोहणाच्या 70व्या वर्धापनदिनी ती घोषणा केली होती. परंतु राणी कॅमिलाला अमूल्य कोहिनूर हिऱ्याचा (Kohinoor Diamond) मुकुट मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. राणी एलिझाबेथ यांच्या या घोषणेनंतर आता ब्रिटनच्या राजघराण्याच्या भवितव्याला नवी दिशा मिळेल, असंही मानलं जात आहे.  राणीच्या या मुकुटाचं वैशिष्ट्य म्हणजे कोहिनूर हिरा आहे. हा 105.6 कॅरेटचा मौल्यवान हिरा आहे. तो 14व्या शतकात भारतात सापडला होता आणि मधल्या अनेक दशकांमध्ये तो अनेकांच्या हातात गेला होता. अखेरीस तो राणी एलिझाबेथ यांना मिळाला.

    1849 मध्ये जेव्हा पंजाबवर (Punjab) ब्रिटिशांनी कब्जा केला, तेव्हा हा हिरा राणी व्हिक्टोरियाकडे सोपवण्यात आला होता. तेव्हापासून तो ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा (British Crown Jewels) भाग आहे; मात्र या हिऱ्याच्या मालकीवरून आजही वाद कायम आहे. भारतासह किमान चार देशांमध्ये या हिऱ्याच्या ऐतिहासिक मालकीवरून वाद अजूनही सुरूच आहे. दरम्यान, हा हिरा राणी एलिझाबेथ यांच्यासाठी बनवलेल्या प्लॅटिनम क्राउनमध्ये (Platinum Crown) जडवण्यात आला होता.

    Episodic mobility मुळे ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू; Queen Elizabeth II यांना झालेला हा आजार काय आहे?

    प्रिन्स चार्ल्स (Prince Charles ) आणि कॅमिला यांचा विवाह 2005 मध्ये झाला होता. या लग्नाची संवेदनशीलता ओळखून राजघराण्याकडून घोषणा करण्यात आली होती, की चार्ल्स राजा झाल्यानंतर कॅमिला यांना 'क्वीन कन्सोर्ट' म्हणून ओळखलं जाईल. आता तो कोहिनूर मुकुट (Kohinoor Crown) कॅमिला यांना दिला जाईल की नाही, या मुकुटाचं पुढे काय होईल, हे येत्या काळात राजघराण्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयावरून स्पष्ट होईल.

    दरम्यान, क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूमुळे आता ब्रिटनमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ब्रिटनला राष्ट्रगीत, पासपोर्ट, पोलीस गणवेश तसंच चलनही अपडेट करावं लागणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Britain, Queen