इंग्लड, 16 एप्रिल : यूनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी हजारो कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यापर्णाला मंजुरी दिली आहे. सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. फरार नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकसोबत (PNB) तब्बल 2 अरब डॉलरच्या फसवणुकीचा आरोप आहे. युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी भारतातून फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भारत सरकारसाठी ही मोठी बातमी ठरली आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 570 कोटी रुपयांचा चुना लावला होता.
United Kingdom's Home Minister has approved the extradition of Nirav Modi: CBI official pic.twitter.com/cdqLHDYM92
— ANI (@ANI) April 16, 2021
19 मार्च, 2019 मध्ये अटकेनंतर त्याला जामीन दिलं जात नव्हतं, त्यामुळे तो वंडसवर्थ तुरुंगात बंद आहे. यादरम्यान तो अजूनही ब्रिटेनच्या हाय कोर्टासमोर वेस्टमिस्टंर मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात अपील करू शकतो, अद्यापही त्याच्याजवळ हा पर्याय उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे. नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेला. मुंबईतील विशेष न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: CBI, Criminal, International, Nirav modi, Nirav modi extraction, Shocking news, Uk