नवी दिल्ली, 28 मे : Brazil Airport: ब्राझील एअरपोर्टवर शुक्रवारी एक विचित्र प्रकार घडला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले अनेक जणं हैराण झाले. येथे अचानक एअरपोर्टवरील डिस्प्ले स्क्रीनवर (Display screen at the airport) जाहिरात आणि एअरलाइन्सच्या सूचनांऐवजी पॉर्न फिल्म सुरू झाली. व्यवस्थापनाला याबाबत कळताच त्यांनी तातडीने कारवाई करीत पोलिसांना कळवलं.
एअरपोर्ट व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रियो डी जिनेरियोमध्ये एअरपोर्टवर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले स्क्रीन हॅक करण्यात आला होता. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल...
सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात सांतोस डुमोंट एअरपोर्टवर डिस्प्ले स्क्रीनवर अचानक पॉर्न फिल्म सुरू झाली. यानंतर प्रवाशीही हैराण झाले. तर पालक आपल्या मुलांना हे पाहण्यापासून रोखत होते. व्यवस्थापनाकडून आलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती आणि सूचनांची जबाबदारी दुसऱ्या कंपनीवर आहे. त्यांना याबाबत कळवण्यात आलं आहे. यानंतर हॅक केलेली ही स्क्रीन तातडीने बंद करण्यात आली.
नेमकी स्क्रीन कोणी हॅक केली याचा तपास केला जात आहे. सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.