जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / भयंकर! क्रूर हल्ल्यात दहशतवाद्यांनी अक्षरशः बेचिराख केली 2 गावं, हिंसेत 56 लोक ठार

भयंकर! क्रूर हल्ल्यात दहशतवाद्यांनी अक्षरशः बेचिराख केली 2 गावं, हिंसेत 56 लोक ठार

भयंकर! क्रूर हल्ल्यात दहशतवाद्यांनी अक्षरशः बेचिराख केली 2 गावं, हिंसेत 56 लोक ठार

दहशतवादी हल्ले (terrorist attack) आणि देशांतर्गत अशांतता हे आजच्या जगातील वास्तव आहे. अनेक मोठमोठ्या देशांच्या प्रगतीला यातून खीळ बसली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंकारा, 3 जानेवारी : दहशतवाद (terrorism) आता भीषण जागतिक समस्या बनला आहे. विविध दहशतवादी संघटना अनेक देशांतील नागरिकांना (citizens) वेठीस धरत त्यांचे भयानक हाल करतात. तिथली गावंच्या गावं बेचिराख करतात. आफ्रिकेतील (Africa) नायजर (Niger) नावाच्या देशाचीही कथा अशीच आहे. या देशाच्या नैऋत्य दिशेला (south west) नुकताच एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यात 56 लोक मृत्युमुखी पडले तर 20 हून जास्त जखमी झाले. दहशतवाद्यांनी माली इथल्या दोन गावांवर हल्ला करत या 56 लोकांना मारून टाकलं. या हल्ल्यात चोमोबांगोऊ आणि जारोमदारेय या दोन गावांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. हल्ल्यात ही दोन गावं अक्षरश: उध्वस्त झाली. या भागात  हिंसा (violance) आणि नागरी युद्धामुळे 2017 सालापासूनच आणीबाणी (emergency)  लागू आहे. नायजरच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं, की दहशतवाद्यांनी या दोन गावांना लक्ष्य केलं आहे. यात कदाचित 70 हून जास्त लोक मृत्युमुखी पडलेले असू शकतील. नायजर सरकारनं आरोप केलाय, की माली इथली सशस्त्र दलं नायजरच्या भागात घुसखोरी करत विविध दहशतवादी कारवाया करत असतात. या भागात अल कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संलन्ग असलेले अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत. याआधी 27 डिसेंबरलाही नायजेरियात दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात जवळपास 10 लोक ठार झाले होते. नायजेरियाच्या बोरनो प्रांतात दहशतवादी संघटना बोको हरामनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. बोरनो प्रांतीय सरकारच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी तेव्हाही चार गावांना लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात सरकारी कार्यालयं आणि पोलीस स्थानकं नष्ट केली गेली. सैनिक आणि हल्लेखोरांनी आपसात भीषण गोळीबारही केला होता. यानंतर हल्लेखोरांनी शफ्फा इथंही हल्ले केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात