टोकियो, 22 फेब्रुवारी : जपान हा चोहोबाजून समुद्राने वेढलेला देश आहे. परिणामी समुद्र किनाऱ्याच्या बाबतीत ते खूप सावध असतात. जपानमधील हमामात्सु शहराच्या समुद्रकिनाऱ्यावर लोखंडाचा मोठा गोळा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. जपानी लष्कर, पोलीस आणि तटरक्षक दल याबाबत अलर्ट झाले आहेत. या महाकाय वस्तूच्या फोटोंनी सोशल मीडियावरही खळबळ उडवून दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच जपानी अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. गोलाचे परीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. मात्र, हा लोखंडाचा पोकळ बॉल काय आहे? तो जपानमध्ये कसा पोहोचला हे अद्याप कळू शकलेले नाही? असाही न्यूजमधील वृत्तानुसार, टोकियोपासून सुमारे 155 मैल अंतरावर असलेल्या हमामात्सू या दक्षिणेकडील तटीय शहरामध्ये एका नागरिकाने हा महाकाय गोळा पाहिला. सकाळी 9 वाजता फोन करून पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी गोलाकार वस्तू आहे. या बातमीनंतर जपानी माध्यमांमध्येही खळबळ उडाली. तज्ञांनी एक्स रे तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूच्या आतील भागाची तपासणी केल्यानंतर तो पोकळ असल्याचे आढळून आले. वाचा - तुर्कीनंतर आणखी एक देश शक्तीशाली भूकंपाने हादरला, सलग दुसरे अस्मानी संकट एक्स रे मध्ये काय सापडलं? स्थानिक मीडियाने सांगितले की या गूढ वस्तूचा व्यास सुमारे 1.5 मीटर आहे. तो बॉम्ब किंवा माइन असण्याची शक्यता होती. मात्र, त्याची एक्स-रे करून तपासणी केली असता तो पोकळ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कवचाच्या तपासासाठी बॉम्ब निकामी पथकालाही पाचारण केले होते. काही तपासनीस विशेष सुरक्षा पोशाख परिधान करून शेलची तपासणी करताना दिसले.
समुद्रकिनाऱ्यावर जाण्यावर निर्बंध प्रचंड मोठा गोळा सापडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ समुद्रकिनाऱ्यावर सर्वसामान्यांच्या हालचालींवर बंदी घातली. पोलीस, सुरक्षा रक्षक आणि तटरक्षक दलाने परिसराची नाकेबंदी केली होती. मात्र, दुपारी चार वाजता हे निर्बंध उठवण्यात आले. वाइस न्यूजनुसार, हा एक मोठा गोळा आहे, ज्यावर हुक आहेत आणि ते पाण्याच्या पृष्ठभागावर इतर कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, जपानी सुरक्षा दल आणि पोलिसांनी हा गोळा अधिक तपासासाठी आपल्या ताब्यात ठेवला असून पुढील तपास सुरू आहे.