2 लाख 85 हजार लोकसंख्या असलेला बार्बोडोस हा देश ब्रिटनच्या राणीच्या अंमलातून औपचारिकरित्या स्वतंत्र झाला आहे. एक स्वतंत्र प्रजासत्ताक असल्याचं या देशानं जाहीर केलं आहे. 1834 पासून जवळपास 200 वर्षं या देशानं ब्रिटीशांची गुलामी केली.
ब्रिटनकडून 55 वर्षांपूर्वीच बार्बाडोसला स्वातंत्र्य मिळालं होतं. मात्र अद्याप प्रजासत्ताक निर्माण झालं नव्हतं. प्रजासत्ताक राज्यपद्धती आता लागू करण्यात आली आहे.
ब्रिटनची राणी एलिजाबेथ आणि राजपुत्र चार्ल्स यांचा नजीकच्या भविष्यात होऊ घातलेला राज्याभिषेक यांच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे एक महत्त्वाची राजकीय घटना म्हणून पाहिलं जात आहे.
बार्बाडोस हा कॅरेबियन देश नितांत सुंदर समुद्रकिनारा आणि क्रिकेटप्रेमी नागरिक यांच्यासाठी ओळखला जातो. 1627 साली पहिल्यांदा ब्रिटीश या देशात आले आणि 1961 सालापर्यंत वेगवेगळ्या पद्थतीनं त्यांचा या देशावर प्रभाव राहिला.
सँडा मेसन या आता बार्बाडोसच्या गव्हर्नर जनरल असणार आहेत. त्यांची नियुक्ती राणी एलिझाबेथ यांनीच केली आहे.