जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / आणखी एका TikTok स्टारची वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या; सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ केला शेअर

आणखी एका TikTok स्टारची वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या; सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ केला शेअर

आणखी एका TikTok स्टारची वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या; सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ केला शेअर

तिच्या वडिलांनी ही माहिती दिली. त्याशिवाय तिचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लॉकडाऊनध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातही टिकटॉक स्टारमधील अनेक आत्महत्याच्या घटनांनी चाहत्यांना धडकीच भरली आहे. आणखी एका 18 वर्षीय टिक टॉक स्टारने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टिक टॉक सुपरस्टार (Dazhariaa Quint Noyes) डजरिया हिने वयाच्या 18 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिच्या वडिलांनी डजरिया हिच्या आत्महत्येची बातमी तिच्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन दिली. ही बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. Dazhariaa ही DEE च्या नावाने टिकटॉकवर ओळखली जात होती. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडियावर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता.  Dazhariaa च्या वडिलांनी तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे व ती आपल्यात नसल्याची दु:खद वार्ता दिली. Dazhariaa ने एकदा आमच्याशी बोलायला हवं होतं, असं म्हणत तिच्या वडिलांनी दु:ख व्यक्त केलं आहे. Dazhariaa तणावात असल्याचे सांगितले जात आहे. तिला आत्महत्येचा विचार येत असल्याने यापूर्वी तिने आपल्या पालकांशी बोलायला हवं होतं, अशी खंत व्यक्त केली जात आहे. Dazhariaa एक सोशल मीडिया स्टार होती, टिक टॉकवर तिचे 1.4 मिलीयन फॉलोअर्स होते.

जाहिरात

Dazhariaa हिने काही काळापूर्वी Dee Beauty नावाची एक कंपनी सुरू केली होती. याशिवाय तिचं एक यू-ट्यूब चॅनलदेखील आहे. जेथे ती व्हिडिओ शेअर करीत असे. Dazhariaa च्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सर्व चाहत्यांनी तिच्यासाठी श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात