मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकेवर येऊ शकतं मोठं संकट; हा हिमनग तुटला तर होणार त्सुनामीसारखा हाहाकार

अमेरिकेवर येऊ शकतं मोठं संकट; हा हिमनग तुटला तर होणार त्सुनामीसारखा हाहाकार

अमेरिकेच्या समोर कोरोना व्हायरस (Coronavirus) समस्येचा सामना करताना आता आणखं एक मोठं संकट उभं ठाकलं आहे.

अमेरिकेच्या समोर कोरोना व्हायरस (Coronavirus) समस्येचा सामना करताना आता आणखं एक मोठं संकट उभं ठाकलं आहे.

अमेरिकेच्या समोर कोरोना व्हायरस (Coronavirus) समस्येचा सामना करताना आता आणखं एक मोठं संकट उभं ठाकलं आहे.

वॉशिंग्टन, 13 नोव्हेंबर : अमेरिकेच्या समोर कोरोना व्हायरस (Coronavirus) समस्येचा सामना करताना आता आणखं एक मोठं संकट उभं ठाकलं आहे.  हिमनदीचा (glacier) अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी एक भीतीदायक बाब निदर्शनास आणली आहे. अलास्कामधील बेरी आर्म (Berry Arm Glacier) हा महाकाय हिमनग कधीही ढासळण्याच्या परिस्थितीत आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा हिमनग कधीही फुटेल आणि थेट समुद्रात पडेल अशी परिस्थिती आहे. तसं झालं तर प्रचंड लाटा उसळून त्सुनामीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. समुद्रपातळी वाढून शहरंही पाण्याखाली जाऊ शकतात.

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या (The Ohio State University) बायर पोलर आणि क्लायमेट रिसर्च सेंटरचे संशोधक म्हणतात की 2010 ते 2017 दरम्यान हा हिमनग 120 मीटर खाली घसरला आहे. पश्चिम ग्रीनलँडमध्ये 2017 मध्ये अशीच त्सुनामी आली होती. या आपत्तीमध्ये चार जणांनी आपला जीव गमावला होता.

अति वजनामुळे हिमनग तुटत आहे

अलास्काच्या या हिमनदीमध्ये लँडस्लाइड होत आहे.‌ अति वजनदार बर्फ हे या मागचे कारण आहे असं तज्ज्ञ सांगतात. भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर या हिमनद्या समुद्राच्या किनार्‍यावर आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला बर्फाचे पर्वत आहेत ज्याच्यामुळे त्सुनामी येण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा हे हिमनग तुटतील तेव्हा ते पाण्यात पडून पाणी एका बाजूने वेगाने वाहू लागेल व यामुळे आपत्ती येऊ शकते.

अंटार्क्टिकामध्ये आणखीन एक आपत्ती येऊ शकते

अंटार्क्टिकाच्या पश्चिम भागात थायोटस नावाचा हिमनग वेगाने वितळत आहे. गेल्या 30 वर्षांत तो दुप्पट वेगाने वितळत आहे. खास गोष्ट म्हणजे ही हिमनदी जवळपास गुजरात राज्याच्या क्षेत्रफळाइतकी मोठी आहे. तसंच या हिमनदीचं क्षेत्रफळ 1920000 चौरस किलोमीटर इतके आहे. असं पाहायला गेलं तर कर्नाटकचा विस्तार हा 191,797 चौरस किलोमीटर आणि गुजरात चा196,024 चौरस किलोमीटर आहे.

या हिमनदीत मोठे बर्फाचे तुकडे तयार झाले आहेत. लंडनच्या एक्सेटर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अली ग्रॅहम म्हणतात की या हिमनदीमध्ये एक छिद्र बनवले आहे. या छिद्रात रोबोच्या मदतीने काही परीक्षण करण्यात आले व यातून असे समोर आले की हा हिमनग तुटून समुद्रात पडू शकतो व यामुळे मोठी आपत्ती येण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Tsunami, United States Of America (Country)