जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Omicronनंतर आता दक्षिण आफ्रिकेवर नवं संकट; गूढ आजारामुळे 89 जणांचा मृत्यू

Omicronनंतर आता दक्षिण आफ्रिकेवर नवं संकट; गूढ आजारामुळे 89 जणांचा मृत्यू

South Africa mysterious illness

South Africa mysterious illness

दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनंतर आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं. फांगक शहरात एका गूढ आजारामुळे आतापर्यंत 89 लोकांचा मृत्यू झाला.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली,15 डिसेंबर:  दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची नोंद करण्यात आली होती. ओमिक्रॉन (Corona new Variant) हा व्हेरियंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही वेगाने पसरणारा व्हेरियंट आहे. एकीकडे ओमिक्रॉनचा सामना करतानाच दक्षिण आफ्रिकेसमोर आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं आहे. दक्षिण सुदान देशातील (South Sudan) जोंगलेई राज्यात असणाऱ्या फांगक शहरात एका गूढ आजारामुळे (South Africa mysterious illness) आतापर्यंत 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आजार नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तातडीने वैज्ञानिकांची रॅपिड रिस्पॉन्स टीम याठिकाणी पाठवली आहे.

    महापुरानंतर वाढली रोगराई

    यूएनएचसीआरने (UNHCR) दिलेल्या माहितीनुसार, या देशात सुमारे 60 वर्षांमधील सर्वात मोठा महापूर (South Sudan Flood) आला होता. या महापुराचा जोंगलेईच्या सीमेवर असणाऱ्या राज्यांमधील सात लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. या महापुरानंतर जोंगलेईच्या आजूबाजूला असणाऱ्या शहरांमध्ये मलेरिया सारख्या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असल्याची माहिती देशाचे जमीन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपयोगिता मंत्री लॅम तुंगवार कुडगवोंग यांनी दिली. महापुरामुळे निर्माण झालेल्या अन्नटंचाईमुळे लहान मुलांमध्ये कुपोषण वाढले आहे. पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे कित्येक पाळीव प्राण्यांचाही मृत्यू (Water pollution in South Sudan) झाला आहे. महापुरामुळे अन्न आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची मदतही पोहोचवणे अवघड झाले असल्याचे लॅम यांनी सांगितले. या भागात काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था मेडेकिन्स सॅन्स फ्रंटीयर्स यांनी सांगितले, की महापुरानंतर येथील वैद्यकीय सेवांवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबरला पहिल्यांदा आढळून आलेला ओमिक्रॉन व्हेरियंट आता इतरही अनेक देशांमध्ये (Omicron in other countries) पोहोचला आहे. भारतासह जगभरातील 60 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. केवळ तीन आठवड्यांमध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणात या व्हेरियंटचा प्रसार होत असल्याचे पाहून सर्वच देश अधिक सतर्क झाले आहेत. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या बळीची नोंद (First Omicron death in Britain) झाल्यानंतर सरकारने नागरिकांना बूस्टर डोस देण्यासही सुरूवात केली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य (Omicron more Transmissible than Delta) असला, तरी तो डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी घातक असल्याचे मत काही वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. ओमिक्रॉनची लक्षणे (Omicron Symptoms) डेल्टाच्या तुलनेत अगदी सौम्य आहेत, आणि याची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरजही तितकी नसल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात