वॉशिंग्टन, 07 जानेवारी : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अंतिम निकालानंतर देखील गदारोळ सुरूच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाइट हाऊस आणि संसद भवनात मोठा गदारोळ सुरू केला. या गोंधळादरम्यान झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या गोंधळानंतर वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. गुरुवारी अमेरिकन काँग्रेसमधील इलेक्टोरल कॉलेजबद्दलच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गदारोळ केला. ट्रम्प समर्थकांच्या गदारोळ आणि हिंसाचारामुळे परिस्थिती बिघडली आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. या गोंधळाच्या वेळी ट्रम्प समर्थक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची आणि मारहाण झाली. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाली तर एका महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला आहे. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कमोर्तब करण्यावर अमेरिकेतील काही नागरिक आणि ट्रम्प समर्थकांचा विरोध असून निषेध व्यक्त करण्यात आला.
A volatile scene inside the Capitol pic.twitter.com/cg9BxWw1bO
— Mike Baker (@ByMikeBaker) January 6, 2021
#WATCH | Supporters of outgoing US President Donald Trump hold a demonstration at US Capitol in Washington DC as Congress debates certification of Joe Biden's electoral victory. pic.twitter.com/c7zCgg9Qdu
— ANI (@ANI) January 6, 2021
ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तोडफोड केली असून तुफान राडा घातला आहे. या गोंधळदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केलं होतं त्याचा व्हिडीओ युट्यूब, फेसबुक आणि ट्वीटरवरून देखील हटवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संसद भवनावर हल्ला करणारे राजद्रोही आहेत. लोकशाहीला वाचवण्यासाठी चांगल्या लोकांची आवश्यकता असल्याचं ट्वीट देखील जो बायडन यांनी केलं आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट 12 तासांसाठी ट्वीटरनं लॉक केलं आहे. त्यांनी केलेले तीन ट्वीट हटवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.