Home /News /videsh /

OMG! एलियन्स असतात, सरकारलाही ते माहित आहे; जगप्रसिद्ध गायकाने शेअर केले अनुभव

OMG! एलियन्स असतात, सरकारलाही ते माहित आहे; जगप्रसिद्ध गायकाने शेअर केले अनुभव

लियन्स असतात आणि वेळोवेळी ते (Aliens exists and they help human being says world famous singer) सरकारांना मदत करत असतात, असं विधान एका जगप्रसिद्ध गायकानं केल्यामुळे चर्चेचा उधाण आलंय.

    लंडन, 3 ऑक्टोबर : एलियन्स असतात आणि वेळोवेळी ते (Aliens exists and they help human being says world famous singer) सरकारांना मदत करत असतात, असं विधान एका जगप्रसिद्ध गायकानं केल्यामुळे चर्चेचा उधाण आलंय. प्रसिद्ध ब्रिटीश गायक शॉन रायडर (Famous Singer Shaun Ryder) यानं एलियन्ससंदर्भात काही महत्त्वपूर्ण विधानं केली आहेत. आतापर्यंत एलिय़न्सबाबत आपल्याला विविध अनुभव आले असून त्यांचं अस्तित्व नाकारणाऱ्यांना आणि त्यांच्याबाबत नकारात्मक बोलणाऱ्यांना रायडर यांनी पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. काय म्हणाले रायडर? जेव्हा स्टिफन हॉकिंगसारखे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ एलियन्सना भेटणं हे मानवासाठी हानीकारक असल्याचं म्हणतात, तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही, असं शॉन रायडर यांनी म्हटलं आहे. अशा विधानांकडे हसून दुर्लक्ष करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मात्र एलियन्स हे मानवजातीचे मित्र असून त्यांनी नेहमीच सरकारांना मदत केल्याचं रायडर यांनी म्हटलं आहे. सरकारांना आहे कल्पना एलियन्स प्रत्यक्ष अस्तित्वात असून ते अनेक देशांच्या सरकारांना मदत करत असल्याचा दावा रायडर यांनी केला आहे. किंबहूना, अनेक देशांची धोरणं ठरवण्यातदेखील एलियन्सचा मोठा सहभाग असतो, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. सरकारला विविध मुद्द्यांवर एलियन्स मार्गदर्शन करत असून ते मानवजातीचे मित्र आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा - अरे बापरे! हे पोट आहे की....! रुग्णाचा एक्स-रे पाहून डॉक्टरही हादरले शेअर केला अनुभव ‘डेली स्टार’ला दिलेल्या मुलाखतीत रायडर यांनी त्यांना आलेला एलियन्सचा अनुभव शेअर केला आहे. मी आणि माझा मित्र रस्त्याने जात असताना आमचं अचानक आकाशाकडे लक्ष गेलं. वास्तविक, रस्त्याने जाताना आम्ही आकाशाकडे पाहण्याची काहीच गरज नव्हती. मात्र तरीही आमचं लक्ष आकाशाकडे गेलं. तिथं आम्हाला एक युएफओ दिसला. त्याचा आकार खूप मोठा होता. एखाद्या जग्वार कारएवढ्या आकाराची ती तबकडी आम्हाला दिसली आणि काही वेळात गायब झाली. त्यानंतर आपल्याला एलियन्सबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे आपण अनेक वर्षं संशोधन कऱण्यात घालवली, असं त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Aliens, Britain, Singer

    पुढील बातम्या