• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • जगातलं असं गाव जिथे प्रत्येकजण दोरीवरून चालतो, आहे 100 वर्षांची परंपरा

जगातलं असं गाव जिथे प्रत्येकजण दोरीवरून चालतो, आहे 100 वर्षांची परंपरा

जगात असं एक गाव आहे, जिथली (A village where everyone walks on ropes) प्रत्येक व्यक्ती दोरीवरून चालते.

 • Share this:
  मॉस्को, 19 ऑक्टोबर : जगात असं एक गाव आहे, जिथली (A village where everyone walks on ropes) प्रत्येक व्यक्ती दोरीवरून चालते. या गावातील प्रत्येकजण जन्मापासूनच दोरीवर चालण्याची कला (Everyone learns to walk on ropes) शिकायला सुरुवात करतो, असं म्हटलं आहे. त्यामुळं गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकजण लहान वयातच ही कला शिकून घेतो. वास्तविक, दोरीवरून चालणं ही अत्यंत अवघड आणि जिकीरीची कला. अनेक वर्षांच्या सरावानंतर हे साध्य होतं. मात्र या गावातील प्रत्येकालाच ही कला साध्य झाली आहे. गावातील महिला, पुरुष, लहान मुलं आणि वृद्ध मंडळीदेखील दोरीवरून चालताना दिसतात. हे आहे कारण रशियातील या गावाचं नाव आहे सोवाक्रा-1. या गावाच्या नावात 1 आकडा असण्याचं कारण म्हणजे याच नावाचं आणखी एक गाव रशियात आहे. या गावात दोरीवर चालण्याची ही प्रथा सुरु होण्यामागे अनेक कारणं आहेत. काहीजण सांगतात की आपल्या प्रेमिकेपर्यंत जलद पोहोचण्यासाठी प्रेमिकांकडून दोऱ्यांचा वापर केला जात असे. त्यातून ही प्रथा सुरू झाली. काहीजणांच्या मते हा भाग डोंगराळ आणि दुर्मिळ असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी दोरीचा वापर केला जात असे. तर काहीजणांनी यामागे पाऊस आणि पुराचं कारण असल्याची माहिती दिली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असे आणि पूल तुटत असत. त्यामुळे रहदारीचे सगळे मार्ग बंद होत होते. त्याच कारणासाठी दोरीवरून चालत पूल पार करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळेच ही कला गावकरी शिकल्याचं सांगितलं जातं. हे वाचा- हनीमूनसाठी जाणं या कपलला पडलं महागात; 100 वर्षांपूर्वी जमिनीत पुरलेला बाँब फुटला गाव पडलं ओस 1980 च्या दशकात या गावची लोकसंख्या होती 3 हजार. सध्या मात्र केवळ 400 लोकच या गावात राहतात. अनेक तरुण नोकरीसाठी आणि उद्योगासाठी शहरात निघून गेले आहेत. त्यामुळे नवी पिढी आता ही कला शिकत नसल्याचं दिसत आहे. तर गावात राहणारी बहुतांश मंडळी ही वृद्ध झाल्यामुळे त्यांना आता दोरीवरून चालता येत नाही. त्यामुळे ही कला नामशेष होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
  Published by:desk news
  First published: