मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कहर! पाकिस्तानातील भारतीय दूतावासात ड्रोनची घुसखोरी, सुरक्षा प्रोटोकॉलचा भंग झाल्याप्रकरणी भारताची तीव्र प्रतिक्रिया

कहर! पाकिस्तानातील भारतीय दूतावासात ड्रोनची घुसखोरी, सुरक्षा प्रोटोकॉलचा भंग झाल्याप्रकरणी भारताची तीव्र प्रतिक्रिया

इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात एक औपचारिक कार्यक्रम सुरू असतानाच एक ड्रोन हवेतून दूतावासाच्या परिसरात दाखल झाला. सुरक्षा आणि प्रोटोकॉल या दोन्हीचा भंग असल्याची प्रतिक्रिया भारतानं दिली आहे.

  • Published by:  desk news

इस्लामाबाद, 2 जुलै: पाकिस्तानमधील इस्लामाबादइमध्ये (Islamabad) असणाऱ्या भारतीय दूतावासाच्या (Indian High Commission) परिसरात ड्रोन (Drone) फिरत असल्याचं आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या या कृतीचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला असून सुरक्षा (Security) आणि आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचा (International Protocol) हा भंग असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये एअरफोर्सच्या बेसवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आल्यामुळं पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक कुरापती काढल्या जात असल्याचं दिसून येत आहे.

भारतीय दूतावासात एक औपचारिक कार्यक्रम सुरू असतानाच हा ड्रोन हवेतून दूतावासाच्या परिसरात दाखल झाला. भारतीय दूतावासातील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी हा ड्रोन पाठवण्यात आला असावा, असा अंदाज दूतावासातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या शनिवारी म्हणजेच 26 जूनला ही घटना घडली. विशेष म्हणजे त्याच वेळी जम्मूमध्येदेखील ड्रोन हल्ले होत होते.

ड्रोनमागचं रहस्य

इस्लामाबादमधील या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 जूनला जम्मूमधील भारतीय वायूसेनेच्या एअरबेसवर ड्रोन हल्ला कऱण्यात आला होता. ड्रोनमध्ये स्फोटकं लपवून त्याद्वारे दोन स्फोट करण्यात आले होते. त्यानंतरही जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात पाकिस्तानी ड्रोनचा संचार असल्याचं दिसून आलं होतं. रविवारच्या घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा वाढवण्यात आली असून ड्रोन हल्ल्याचे त्यानंतरचे प्रयत्न उधळून लावण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे.

आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनची घुसखोरी

आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात ड्रोन घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न नुकचात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हाणून पाडला. पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी हा ड्रोन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब जवानांच्या लक्षात येताच त्यांनी ड्रोनवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर हा ड्रोन मागे घेण्यात आला आणि तो पाकिस्तानमध्ये परत गेला. या परिसरातील सुरक्षेची रेकी करण्यासाठी हा ड्रोन पाठवण्यात आल्याचं सैन्यदलातील सूत्रांकडून समजतं आहे.

हे वाचा - चिनी 'विळा-हातोड्या'ची 100 वर्षं! सत्ताधारी पक्षाने अशी साजरी केली शताब्दी

हल्ल्याची पद्धत बदलते आहे

मानवी दहशतवादी घुसवून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे सर्व मनसुबे आतापर्यंत उधळले गेल्यामुळे आता पाकिस्तानकडून मानवरहित साधनांमार्फत घुसखोरीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे सलग तीन दिवस जम्मू काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या परिसरात वेगवेगळे ड्रोन आढळून येत आहेत. मात्र जवानांच्या सतर्कमुळे हे सर्व हल्ले निकामी करण्यात भारताला यश आलं आहे.

First published:

Tags: Drone shooting, Pakistan, Security