जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / नवरी 25 तर नवरदेव 70 वर्षांचा; समाजाची पर्वा न करता थाटला संसार! 

नवरी 25 तर नवरदेव 70 वर्षांचा; समाजाची पर्वा न करता थाटला संसार! 

नवरी 25 तर नवरदेव 70 वर्षांचा; समाजाची पर्वा न करता थाटला संसार! 

त्यांच्या वयात 45 वर्षांचं अंतर आहे. हे वय आपल्या नात्याच्या आड कधीही येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

    नवी दिल्ली, 14 जून : प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. खरंच प्रेमात पडलेल्यांना समोरच्याचं वयही दिसेनासं होतं का? प्रेमाच्या या समीकरणांना तंतोतंत लागू पडणारी गोष्ट कॅनडातल्या (Canada) एका जोडप्याच्या रूपाने पाहायला मिळते. त्यांच्या प्रेमाला वयाचं बंधन अजिबातच नाही. कारण या जोडप्यातल्या पत्नीचं वय आहे 25, तर पती आहे चक्क 70 वर्षांचा. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. स्टेफनी आणि डॉन अशी या दोघांची नावं आहेत. स्टेफनीचं वय 25 आहे, तर डॉन यांचं वय 70 वर्षं (Young Woman And Old Man Marriage) आहे. त्यांच्या वयात 45 वर्षांचं अंतर आहे. हे वय आपल्या नात्याच्या आड कधीही येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. लोकांना काय वाटतं, याची पर्वा करत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. एका शोमध्ये त्यांनी स्वतःबद्दलची ही अचंबित करणारी माहिती दिली. पत्नी स्टेफनी हिनं Love Don’t Judge या शोमध्ये सांगितलं, की पाच वर्षांपूर्वी ती डॉन यांना एका पबमध्ये भेटली. त्याच पबमध्ये ती काम करत होती. डॉन जेव्हा या पबमध्ये यायचे, तेव्हा तिला खूप आनंद वाटायचा. त्यानंतर त्यांच्यातली जवळीक वाढली. मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला; मात्र लग्नाबाबत आपल्या घरचे खूष नसल्याचं स्टेफनीनं सांगितलं. जेव्हा आई-वडील आणि भावाला त्यांच्या नात्याबद्दल कळालं, तेव्हा त्यांना स्टेफनीची काळजी वाटली. वयातल्या अंतरामुळे हे नातं फार काळ टिकू शकणार नाही, अशी भीती घरच्यांना होती; मात्र स्टेफनी आणि डॉन यांनी कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करत लग्न केलं. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. त्याचं नाव लाचलान असं आहे. नवरा-बायकोच्या वयात अंतर असू शकतं. काही नात्यांमध्ये बायको नवऱ्यापेक्षा मोठीही असते; मात्र तब्बल 45 वर्षांचं अंतर असलेलं जोडपं तसं दुर्मीळच. अशा नात्यांकडे समाजही वेगळ्या नजरेनं पाहतो. स्टेफनी आणि डॉनचं तसंच आहे. डॉन सांगतात, की अनेकदा लोकांना ते लाचलानचे आजोबा असल्यासारखं वाटतं; पण अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नसल्याचं ते म्हणतात. लोकांना खरं काय ते सांगण्याच्या फंदातही ते पडत नाहीत. डॉन यांच्या जीवनविम्याच्या (Life Insurance) पैशांसाठी आपण त्यांच्यासोबत राहत असल्याचं अनेकांना वाटतं, असं स्टेफनीचं म्हणणं आहे; मात्र हे दोघंही जगाची पर्वा न करता त्यांचं वैवाहिक जीवन आनंदात जगत आहेत. लग्न करताना वय पाहिलं जातं; मात्र विचार जुळले, की वयाचं बंधन गळून पडतं. तसंच काहीसं स्टेफनी आणि डॉन यांचं झालं असावं. चौकटीपलीकडे जाऊन हे जोडपं विवाहाच्या रेशीमधाग्यात बांधलं गेलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: marriage
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात