मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मेक्सिकोत आढळल्या मानवी अवशेषांच्या 53 पिशव्या; टोळी युद्धातील हिंसाचार आहे कारण?

मेक्सिकोत आढळल्या मानवी अवशेषांच्या 53 पिशव्या; टोळी युद्धातील हिंसाचार आहे कारण?

ऑक्टोबरच्या महिन्यापासून बिबियाना मेंडोझा यांच्या गटानं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या गटाने मानवी अवशेषांच्या 53 पिशव्या बाहेर काढल्या आहेत.

ऑक्टोबरच्या महिन्यापासून बिबियाना मेंडोझा यांच्या गटानं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या गटाने मानवी अवशेषांच्या 53 पिशव्या बाहेर काढल्या आहेत.

ऑक्टोबरच्या महिन्यापासून बिबियाना मेंडोझा यांच्या गटानं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या गटाने मानवी अवशेषांच्या 53 पिशव्या बाहेर काढल्या आहेत.

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : हिंसाचार आणि नरसंहार हा मानवी समाजाचा अविभाज्य घटक आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज कुठेनाकुठे हिंसेच्या घटना घडत असतात. काही घटना उघडकीस येतात तर काही घटना दडपून टाकल्या जातात. विशेषत: खूनाच्या घटना मोठ्या प्रमाणात दाबल्या जातात. अशा प्रकरणांतील आरोपी मृतदेहांची जमिनीत पुरून किंवा ते जाळून विल्हेवाट लावतात.

मृतदेह जाळल्यानंतर शक्यतो पुरावा शिल्लक राहत नाही मात्र, जर तो पुरला तर कधीनाकधी त्याचे अवशेष आढळतातच. मेक्सिकोमध्ये नुकतेच 53 पिशव्या भरून मानवी अवशेष आढळले आहेत. मेक्सिकोतील इरापुआटो येथे सध्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सव सुरू आहे. हे ठिकाण कधीकाळी समृद्धी, संस्कृती आणि हिंसाचारासाठी प्रसिद्ध होतं. याच ठिकाणी बिबियाना मेंडोझा नावाच्या महिलेनं एका गुप्त कबरीतून मानवी अवशेष शोधून काढले आहेत. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

विशेष म्हणजे एका श्वानामुळे हे मानवी अवशेष सापडले आहेत. एक 32 वर्षीय महिला आपल्या हरवलेल्या भावाचा शोध घेत आहे. काही स्थानिक नागरिकांनी एका श्वानाच्या तोंडात मानवी हात पाहिल्याचं समोर आल्यानंतर ही महिला गुआनाजुआटो राज्यातील इरापुआटो शहरात पोहचली होती. 'एकीकडे जग सेर्व्हांटिनो फेस्टिव्हल साजरा करत असताना आम्ही मात्रं इथं जमिनीतले मुडदे उकरत बसलो आहोत, पण तेही ठीकच आहे कारण त्याचवेळी जगात कुठंतरी आणखी माणसं गाडली जात आहेत,' असं हरवलेल्या व्यक्तींना शोधणाऱ्या महिलांच्या संस्थेच्या संस्थापिका मेंडोझा यांनी सांगितलं.

ऑक्टोबरच्या महिन्यापासून बिबियाना मेंडोझा यांच्या गटानं आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या गटाने मानवी अवशेषांच्या 53 पिशव्या बाहेर काढल्या आहेत. पोलीस अधिकारी या अवशेषांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपल्या निष्फळ शोधाला कंटाळलेल्या मेंडोझा यांना अजिबात कारणं ऐकण्याची इच्छा नाही. गुआनाजुआटोला अधिक सुरक्षित करण्याची आश्वासनं देणारे राज्यपाल आणि जबाबदारी झटकणारे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांची मेंडोझा यांना घृणा वाटते.

हेही वाचा - ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार! एलॉन मस्क संख्याबळ आणखी कमी करण्याच्या विचारात

विदेशी ऑटो कंपन्यांच्या कारखान्यांचं औद्योगिक केंद्र असलेल्या गुआनाजुआटो येथे अलीकडच्या काही महिन्यांत टोळी हिंसाचाराचे सुमारे 300 बळी अशाच परिस्थितीत मृत आढळले आहेत. इरापुआटो हे गुआनाजुआटो राज्याच्या राजधानीपासून एक तासाच्या अंतरावर आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मेक्सिकन नगरपालिकांपैकी सर्वात असुरक्षित ठिकाण म्हणून या शहराचा दुसरा क्रमांक लागतो. कार्टेल टर्फ वॉरमुळे ग्वानाजुआटोला मेक्सिकोमधील सर्वात हिंसक राज्य अशी वाईट ओळख मिळाली आहे. या वर्षी (2022) जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत याठिकाणी दोन हजार 400 हून अधिक खून झाले आहेत. राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण 10 टक्के इतकं आहे. याच कालावधीमध्ये जवळपास तीन हजार व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत.

एकेकाळी शांतता नांदत असलेल्या या राज्यात सध्या रक्तपात होत असूनही, जवळपास 6.1 दशलक्ष लोक राहतात. हे मेक्सिकोमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. कोलोनिअल शैलीतील राजधानी तसेच सॅन मिगुएल डी अॅलेंडे हे नयनरम्य शहर दरवर्षी हजारो परदेशी लोकांना आकर्षित करतं. पर्यटकांच्या नजरेआड तेथील हिंसाचार घडतो.

9 नोव्हेंबर रोजी इरापुआटोपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेल्या अपासियो एल अल्टो येथील बारमध्ये नऊ जणांची हत्या करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी रक्तबंबाळ मृतदेह, तुटलेल्या काचा, बाटल्या आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा कार्टेलचा संदेश प्रसिद्ध केला होता. मात्र, पालिकेनं फुटपाथवरील रक्ताचे डाग आणि टाकून दिलेली सिक्युरिटी टेप व्यतिरिक्त कशाचीही दखल घेतली नाही. जणू काही घडलंच अशा थाटात येथील जनजीवन सुरळीत सुरू आहे.

गेल्या पाच महिन्यांत गुआनाजुआटोमधील पाच हत्याकांडांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची सवय असलेल्या रहिवाशांसाठी देखील ही गोष्ट धक्कादायक आहे. इरापुआटोयापासून काही प्रमाणात अलिप्ट होतं. याबाबत मेंडोझा म्हणाल्या, "रस्त्यांवर संदेशांसह मृतदेह पडलेले पाहणं आमच्यासाठी नवीन गोष्ट आहे."

Salamanca येथे Mazda या जपानी कंपनीचा प्लांट आहे. हा कंपनीचा जपानबाहेरील सर्वात मोठा प्लांट आहे. अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणाऱ्या या प्लांटमध्ये दिवसाला सुमारे 815 वाहने तयार होतात. याशिवाय, गुआनाजुआटो या राज्यामध्ये टोयोटा, होंडा, जनरल मोटर्स यांचेही कारखाने आहेत. पायाभूत वाहतूक सुविधा, पुरवठा नेटवर्क आणि कुशल कामगार हे गुआनाजुआटोची काही वैशिष्ट्ये आहेत. आर्थिक उत्पादनाच्याबाबत या राज्याचा मेक्सिकोतील 32 राज्यांमध्ये सहावा क्रमांक लागतो.

उद्योगांतील आकडेवारीनुसार, परिसरातील हिंसाचाराचा कंपन्यांच्या कामावर आणि विस्तार योजनांवर कोणताही प्रभाव दिसत नाही. कॉपरमेक्स एम्प्लॉयर्स असोसिएशनचे स्थानिक प्रमुख हेक्टर रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारामुळं कोणत्याही कंपनीनं गुंतवणूक रद्द केल्याचं निदर्शनास आलेलं नाही.

या प्रदेशातील गुन्हेगारी ही, जॅलिस्को न्यू जनरेशन आणि सांता रोसा डे लिमा कार्टेल यांच्यातील भयंकर टोळी युद्धाची उपज आहे. सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड सॉसेडो यांच्या मते, पॅसिफिक बंदरे आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील ड्रग तस्करीच्या मार्गावरील गुआनाजुआटो हे राज्य एक महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. हा प्रदेश फेंटॅनाइल आणि कोकेन तस्करीच्या मार्गांचा भाग आहे. 'मोठ्या टोळ्या स्थानिक ड्रग्ज विक्री आणि नाईटलाइफच्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्तपुरवठा करतात, असंही सॉसेडो यांनी सांगितलं.

गुआनाजुआटो सुरक्षा अधिकारी सोफिया ह्युएट यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील 10 पैकी नऊ खून ड्रग व्यवहाराशी संबंधित आहेत. राज्यातील अधिकारी अटकेचा कारवाया करतात. पण, त्या पुरेशा ठरत नाहीत. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत, असं सोफिया यांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Human story, International, Mexico