मराठी बातम्या /बातम्या /विदेश /च्युइंगम खाणाऱ्याला दोन वर्षांचा तुरुंगवास, विचित्र कायद्याचे होतात अनेक फायदे

च्युइंगम खाणाऱ्याला दोन वर्षांचा तुरुंगवास, विचित्र कायद्याचे होतात अनेक फायदे

जर कुणी च्युइंगम खाऊन रस्त्यात थुंकलं तर (2 years jail for having chweing gun and spitting in public place) त्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

जर कुणी च्युइंगम खाऊन रस्त्यात थुंकलं तर (2 years jail for having chweing gun and spitting in public place) त्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

जर कुणी च्युइंगम खाऊन रस्त्यात थुंकलं तर (2 years jail for having chweing gun and spitting in public place) त्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

सिंगापूर, 9 नोव्हेंबर: जर कुणी च्युइंगम खाऊन रस्त्यात थुंकलं तर (2 years jail for having chweing gun and spitting in public place) त्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ही शिक्षा दिली (Strange law in Singapur) जाते सिंगापूरमध्ये. जगातील अनेक देशांत अशा गोष्टींविरोधात कडक कायदे करण्यात आलेले असतात, ज्या इतर देशांच्या दृष्टीने अगदी (Law and order situation changes accoring to counties) सामान्य आणि किरकोळ गोष्टी असतात. एखाद्या देशात परवानगी असलेल्या बाबींसाठी दुसऱ्या देशात मात्र मनाई असते. सिंगापूर आणि च्युइंगम यांचं असंच विळ्याभोपळ्याचं नातं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या देशात च्युइंगमवर विविध निर्बंध आहेत.

काय आहे इतिहास?

च्युइंगमवरील बंदीच्या इतिहासाची सुरुवात होते या देशाचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्यापासून. देशातील शिस्त आणि सुव्यवस्था नीट राखण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींवर निर्बंध घातले होते. त्यात च्युइंगमचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात सिंगापूरच्या नागरिकांमध्ये असलेली बेशिस्त आणि बेफिकीर स्वभाव यांना आळा घालण्यासाठी अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती.

च्युइंगमवर बंदी कशासाठी?

च्युइंगम खाऊन नागरिक अनेक ठिकाणी थुंकत असल्याचं सुरुवातीच्या काळात लक्षात आलं. त्यामुळे ठिकाठिकाणी अस्वच्छता पसरत होती. यामुळे रस्त्यात अनेक ठिकाणी पायाला च्युइंगम चिकटणे, कचरा वाढणे, रोगराई पसरणे आणि नाले-गटारं तुंबणे यासारख्या समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे लोकांना शिस्त लावण्याच्या हेतून च्युइंगमवर बंदी घालण्यात आली होती. जर कुणी च्युइंगम खाताना आढळलं तर त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होत असे.

बंदी उठली, मात्र शिक्षा वाढली

2004 साली अमेरिकेसोबत झालेल्या करारानंतर सिंगापूरमधील च्युइंगमवरील बंदी उठवण्यात आली. आता सर्वसामान्य नागरिकांना च्युइंगम जवळ बाळगण्याची आणि खाण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याबाबतचे कायदे अधिकच कडक करण्यात आले आहेत. च्युइंगम खाऊन कुणी रस्त्यात थुंकताना दिसलं, तर त्याला 74 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कायद्यात तरतूद आहे. जर हाच गुन्हा करताना दुसऱ्यांदा पकडलं तर 1 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड आणि दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Imprisonment, Law, Singapore