मुंबई, 31 डिसेंबर : ब्रिटनमधील थेम्स नदी (Thames River) ही देशाच्या प्रमुख शहरांमधून वाहते. ऑक्सफर्ड, लंडन अशा मोठ्या शहरांमधून वाहणारी ही नदी या शहरांच्या सौंदर्यात आणखी भर घालते. मात्र, याच नदीखाली दडलेल्या एका जहाजामुळे (Warship in Thames River) आता ब्रिटन सरकारचं टेन्शन वाढलं आहे. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या (World War 2) काळात या नदीत बुडालेल्या या जहाजात तब्बल 1,400 टन स्फोटकं (1,400 tonnes Explosives) आहेत. ही विस्फोटके कधीही फुटू शकतात; आणि तसं झालं तर या नदीमध्ये त्सुनामी (Tsunami in Thames river) येऊन किनाऱ्यावरील कित्येक लोकांचे जीव जाऊ शकतात.
याबाबत द सनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, एसएएस रिचर्ड माँटगोमेरी (SS Richard Montgomery) ही युद्धनौका गेल्या 77 वर्षांपासून थेम्स नदीमध्ये बुडालेली आहे. तज्ज्ञांच्या मते, एवढी वर्षं झालेली असूनही, या जहाजावर असलेली स्फोटकं कधीही फुटू शकतात. देशाच्या परिवहन विभागाने (DFT) काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब दिसून आली. हे जहाज जर फुटलं वा कोसळलं तर हा स्फोट (Blast in Thames river) होऊ शकतो, असं डीएफटीच्या अहवालात म्हटलं होतं. हा स्फोट झाल्यास तब्बल पाच मीटर उंचीच्या लाटा नदीमध्ये निर्माण होऊ शकतात, असा इशाराही या अहवालात दिला आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अमेरिकेची आहे ही युद्धनौका
मिळालेल्या माहितीनुसार, ही युद्धनौका अमेरिकेची (US Convoy warship in Thames) आहे. यामध्ये विमानांसाठी वापरण्यात येणारे बॉम्ब भरण्यात आले होते. यात हाय एक्स्प्लोझिव्ह ब्लॉकबस्टर आणि क्लस्टर बॉम्बच्या 200 पेट्या आहेत. तसेच सुमारे 500 किलो (1000lbs) वजनाचे 100हून अधिक साधे बॉम्बही आहेत. 1944 च्या ऑगस्ट महिन्यात हे जहाज ब्रिटनकडे निघालं होतं. मात्र, त्यांना ग्रेट नोर (Great Nore) भागात थांबण्याचे आदेश देण्यात आले. याच ठिकाणी हे जहाज बुडालं होतं.
रॉयल नेव्हीची विशेष मोहीम
ब्रिटनची रॉयल नेव्ही, 29 तज्ज्ञांचा एक ग्रुप आणि संरक्षण मंत्रालय संयुक्तपणे हे बॉम्ब बाहेर काढण्याच्या मोहीमेवर काम करत आहेत. डिस्पोजलच्या कामात तज्ज्ञ असणाऱ्या क्रॅक टीमचे सदस्य थेम्स इस्ट्यूरीच्या नॉर सँडबॅक (Nore Sandbank sunken Ship) भागात ही मोहीम पार पाडतील. प्राथमिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर, 2022 च्या जून महिन्यात या मोहिमेला सुरुवात होईल. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांत ही मोहीम फत्ते होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Britain, Explosives