- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
पार्टनरला द्या Snowfall च्या खास क्षणांचं गिफ्ट, ख्रिसमस-नववर्षाचं रेल्वेनं आणलं स्वस्तात मस्त पॅकेज

IRCTC Kashmir Tour Package: थंडीमध्ये काश्मीरला भेट देण्याचा आनंद काही औरच! या काळात काश्मीरचा बहुतांश परिसर बर्फानं आच्छादलेला असतो.
- News18 Lokmat
- Last Updated: Nov 29, 2022 01:55 PM IST
मुंबई, 30 नोव्हेंबर: हिवाळ्यामध्ये काश्मीरमध्ये फिरण्याची मजा काही औरच असते. या काळात काश्मीरमधील गुलमर्गवर बर्फाची झालर पसरलेली असते. तुम्हाला येथे बर्फवृष्टी म्हणजे Snowfallसुद्धा पाहायला मिळू शकतो. ज्यांना Snowfall पाहायची इच्छा आहे, ते यावेळी IRCTC च्या काश्मीर टूर पॅकेजचा (Kashmir Tour Package) आनंद घेऊ शकता. आयआरसीटीसी तुमच्यासाठी स्वस्तात मस्त संधी घेऊन आली आहे. इंडियन रेल्वेची सहायक कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and tourism corporation IRCTC) तुम्हाला काश्मीरला फिरण्यासाठी खास पॅकेज देत आहे. या पॅकेजची खासियत म्हणजे हा प्लॅन खूपच स्वस्त आहे. फक्त 25,000 रुपयांत 6 दिवसांची ट्रिप ज्यामध्ये फ्लाइटचं तिकीट, हॉटेल आणि जेवण सर्व काही समाविष्ट आहे. सोबतच तुम्ही थंडीच्या काळात Snowfallची मजाही घेऊ शकता.
IRCTC काश्मीर टूर पॅकेज- 6 दिवस आणि 5 रात्री:
IRCTCचं काश्मीर पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रींचं आहे. हे टूर पॅकेज रायपूरहून सुरु होईल. IRCTCची हे टूर पॅकेज 23 मार्च 2023 पर्यंत रोज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काश्मीरसाठी पहिली फ्लाइट रायपूरहून दिल्ली घेऊन जाईल आणि नंतर दिल्लीतून काश्मीरला घेऊन जाईल. त्याच पद्धतीनं येताना काश्मीरहून दिल्ली आणि दिल्लीतून रायपूर असा परतीचा प्रवास असेल. हे टूर पॅकेज तुम्ही कधीही घेऊ शकता. हे कोणत्याही ठराविक दिवसासाठी मर्यादित नाही. तुमच्याकडं खिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं काश्मीर फिरण्याची नामी संधी आहे.
हेही वाचा: दोन रुपये द्या अन् 5 लाख मिळवा, समजून घ्या कसं?
27,000 रुपयांपासून पॅकेज सुरु-
IRCTCच्या या टूर पॅकेजमध्ये फ्लाइट, हॉटेल, लोकल ट्रान्सपोर्ट, जेवण तसेच नाश्ता यांचा समावेश आहे. या टूर पॅकेजची सुरुवात 25, 170 रुपयांपासून होते. जर फक्त एक व्यक्ती प्रवास करणार असेल, तर 37,410 रुपये द्यावे लागतील. जर दोन व्यक्ती प्रवास करणार असतील तर 30055 रुपये द्यावे लागतील आणि तीन लोक प्रवास करणार असतील तर 29, 250 द्यावे लागतील. जर तुम्ही मुलांसमवेत प्रवास करणार असाल परंतु एक्स्ट्रा बेड घेणार नसाल तर 25, 110 रुपये द्यावे लागतील. सरकारी कर्मचारी यावर LTC चा फायदा घेऊ शकतात. IRCTCच्या ऑफिशियल वेबसाईटवर या टूर पॅकेजची तमाम माहिती तुम्हाला मिळेल.
काश्मीरमध्ये या ठिकाणांना द्या भेट-
काश्मीरमध्ये गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग इत्यादी ठिकाणं फिरण्यासारखी आहे. हिवाळ्यामध्ये काश्मीरला भेट देण्याची युवा वर्गामध्ये क्रेझ आहे. तुम्हीसुद्धा खिसमस तसेच नववर्षाच्या निमित्तानं स्नोफॉलचा आनंद घ्यायची इच्छा असेल, तर तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
मिळेल ही सर्व्हिस-
वरील पॅकेजमध्ये फ्लाइट तिकीट, हॉटेल, नाश्ता आणि जेवण तसेच लोकल ट्रान्सपोर्ट इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.