Best Travel Tips: प्रवास करताना आजारी पडण्याची भिती? या टिप्स फॉलो करा अन् बिनधास्त फिरा

Best Travel Tips: प्रवास करताना आजारी पडण्याची भिती? या टिप्स फॉलो करा अन् बिनधास्त फिरा

Best Travel Tips: प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत, प्रवास करताना निरोगी राहण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करता?

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : प्रवास करण्याची अनेकांना आवड असते. काही लोक कामाच्या निमित्ताने खूप प्रवास करतात तर काही लोक आपल्या कामातून वेळ काढतात व रोजच्या त्याच-त्या जीवनशैलीतून थोडी सुटका करण्यासाठी वा ताजंतवानं होण्यासाठी सुट्टी काढतात व एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी सहपरिवार सहल काढतात तेव्हा त्यांना प्रवास करावा लागतो. पण अनेकांना प्रवासाची सवय नसते. त्यामुळे ते प्रवासादरम्यानच किंवा प्रवासानंतर आजारी पडतात. हा त्रास टाळण्यासाठी विशिष्ट काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी प्रवासादरम्यानच काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. या गोष्टी तुम्ही नीट पाळल्या तर प्रवासादरम्यान तंदुरुस्त राहता येतं.

जास्त जेवण करु नका - लांबचा प्रवास असेल तर अशावेळी जास्त जेवण करण्याचं आपण टाळयला हवं. कारण जास्त जेवण केल्याने प्रवासादरम्यान आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. तसंच उलटी व संडासचा त्रासदेखील होऊ शकतो. हे टाळण्यासाठी हलकं-फुलकं जेवण करावं.

ड्रायफ्रूट्स सोबत ठेवा - प्रवासादरम्यान एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे आपल्याला पोषक अन्न खायला मिळेलच याची शाश्वती नसते. अशावेळी जेवणास पर्याय म्हणून आपल्यासोबत काहीतरी खाण्यासाठी असावं. ड्रायफ्रूट हा उत्तम पर्याय आहे. ड्रायफ्रूटमध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात. ती खाऊन आपण आपली भूक भागवू शकतो.

वाचा - चांगल्या आरोग्यासाठी रोज रात्री दुधात घालून प्या हा पदार्थ; असंख्य आहेत फायदे

भरपूर पाणी पिणं - प्रवासादरम्यान फिरताना शरीराची खूप कसरत होते. त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण घटतं. आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणं आवश्यक असतं. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं. यामुळे थकवा वा अशक्तपणा जाणवत नाही.

फळं खा - प्रवासादरम्यान ताजी फळं खाणं हे खूप फायदेशीर ठरतं. लिंबू सरबत किंवा नारळाचं पाणीदेखील आपण पिऊ शकतो. यामुळे आपल्याला उर्जा मिळते व आपण ताजेतवाने होतो.

अशा प्रकारे आपण वरील गोष्टी केल्या तर आपण प्रवासादरम्यान वा प्रवासानंतर होणारा त्रास टाळू शकतो. प्रवासादरम्यान काही त्रास झाला नाही तर आपण त्या प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटू शकतो. वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो. तसेच अनेक गोष्टी शिकू शकतो. प्रवास हा केवळ प्रवास नसतो. तर ती एक आठवण देखिल असते. छान प्रवास झाला तर पुढे कधी त्या प्रवासाच्या आठवणीत रमून जाण्याचा आनंदही घेता येतो.

First published: December 20, 2022, 11:06 PM IST

ताज्या बातम्या