लवकरच भारतीय करू शकणार अंतराळाची सफर! केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

लवकरच भारतीय करू शकणार अंतराळाची सफर! केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

अंतराळ पर्यटन सध्या खूप महाग आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनी Axiom Space ने 3 व्यावसायिकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISI) ची सफर घडवून आणली होती. रिपोर्टनुसार एका प्रवाशाकडून सुमारे 420 कोटी रुपये आकारण्यात आले होते. आता लवकरच भारतही ह्या स्पर्धेत उतरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जुलै : आता लवकरच भारतातूनअंतराळ पर्यटन म्हणजेच स्पेस टुरिझम (Space Tourism) शक्य होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी (24 जुलै 22) सांगितले. ते म्हणाले, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत (in Lower Orbit) मानवी अंतराळ उड्डाण क्षमतेचे प्रात्यक्षिक करून अंतराळ पर्यटनासाठी स्वदेशी क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया करत आहे. स्पेस टुरिझम सध्या खूप महाग आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनी Axiom Space ने 3 व्यावसायिकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची (ISS) सफर घडवून आणली होती. रिपोर्टनुसार त्यावेळी एका व्यावसायिकांकडून सुमारे 420 कोटी रुपये घेण्यात आले होते.

सध्या Axiom Space आणि SpaceX सारख्या कंपन्या अमेरिकन अंतराळ संस्था NASA च्या मदतीने या क्षेत्रात बाजारपेठ निर्माण करत आहेत. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरने (IN-SPACE) स्पेस टुरिझमच्या समावेशासह या उपक्रमांमध्ये प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रोने अंतराळातील विविध क्षेत्रात 61 देशांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंध पुढे नेले आहेत, असे अंतराळातील व्यवहारांसंबंधी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले.

दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह म्हणाले की, अंतराळ विभाग एक सर्वसमावेशक इंटिग्रेटेड स्पेस पॉलिसी तयार करत आहे. ती प्रायव्हेट स्पेस इंडस्ट्रीतील कामांसाठी मार्गदर्शन करेल. नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर (IN-SPACE) ही स्पेस रिसर्चमध्ये प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग वाढवण्यासाठी काम करणारी एक सिंगल विंडो एजन्सी आहे. इस्रो मिशन गगनयान (Mission Gaganyaan) अंतर्गत आपल्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणावरदेखील काम करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था पुढील वर्षापर्यंत अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यात यश प्राप्त करेल, असंही नुकतंच सरकारकडून सांगण्यात आलंय.

Solar AC: एसी कितीही वापरला तरी वीज बिल येईल शून्य; वाचा सविस्तर

पुढील वर्षी ISRO च्या गगनयान मिशन अंतर्गत भारताचे 2 अंतराळवीर अंतराळात जातील. यासाठी या वर्षाच्या अखेरीस दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या चाचणीत मानवरहित यान अवकाशात पाठवलं जाईल. तर दुसऱ्यांदा हे वाहन रोबोसह अंतराळात जाणार आहे. या रोबोचं नाव व्योमित्र ठेवण्यात आलंय. या चाचणीच्या निकालांचं विश्लेषण केल्यानंतर इस्रो मानवी अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असं एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं.

कुणीही करू शकतं अंतराळाची सफर

पश्चिमेतील देशांतील रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson), जेफ बेझॉस (Jeff Bezos) आणि एलॉन मस्क (Elon Musk) या तीन बिलेनियर आंत्रप्रेन्युअर्सनी कमर्शियल स्पेस टुरिझमचं क्षेत्र विकसित करण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले असून, त्यांच्या कंपन्या त्याबाबतीत परस्परांशी स्पर्धा करत आहेत. त्या तिघांनीही पैसे देऊन अंतराळात जाण्यास इच्छुक ग्राहकांना अंतराळाची सफर घडवण्याची स्वप्नं दाखवली आहेत.

एलॉन मस्क यांच्या SpaceX या कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेल्या 31 रॉकेट्सपेक्षा अधिक प्रमाणात रॉकेट्स या वर्षी लाँच केली आहेत. अंतराळात स्वतःचा इंटरनेट सॅटेलाइट सोडण्याच्या उपक्रमाअंतर्गत ही रॉकेट्स सोडण्यात आली होती. बेझोस यांच्या अमेझॉनने एप्रिल महिन्यात केलेल्या एका कराराअंतर्गत तीन कंपन्यांच्या सहाय्याने सॅटेलाइट सोडला. स्पेसएक्सच्या स्टारलिंक (SpaceX's Starlink) या ब्रॉडबँड इंटरनेट सेवेला स्पर्धा देण्यासाठी हा उपग्रह सोडण्यात आला.

ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक होल्डिंग्ज (Virgin Galactic Holdings) या स्पेस टुरिझम कंपनीने पुढच्या वर्षी 2023 च्या पहिल्या तिमाहीत पुढचं कमर्शिअल स्पेस फ्लाइट लाँच करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. गेल्या वर्षी ब्रॅन्सन यांनी मॅक्सिकोच्या वाळवंटातून व्हर्जिन गॅलेक्टिक रॉकेटमधून अंतराळात 50 मैलांपर्यंत प्रवास करून पृथ्वीवर सुरक्षित परत येण्यात यश मिळवलं होतं. अंतराळात गेलेलं हे रॉकेट पूर्ण प्रवासी क्षमतेनं भरलं होतं.

पश्चिमेकडील देशांतील नागरिकांप्रमाणे भारतीयही अंतराळभरारी घेऊ शकतील हे स्वप्नही खूप चांगलं आहे. नजीकच्या भविष्यात ते सत्यात उतरलं की ही गोष्ट भारताच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा ठरेल.

First published: July 25, 2022, 5:15 PM IST

ताज्या बातम्या